-
आष्टी (रिपोर्टर):- सुरत -चेन्नई (ग्रीनफिल्ड) राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकर्यांना 2013 च्या भुमिअधिग्रहन कायद्यानुसार मोबदला मिळावा या राष्ट्रीय महामार्गामुळे जमिनीचे तुकडे होणार आहेत.जमिनीचा मोबदला किती मिळणार फळबागा, घरे, बोर, विहीर, पाणंद रस्ते यांचे काय या सर्व गोष्टी खुलासा होऊन प्रत्यक्ष मोबदला मिळल्याशिवाय शेतकरी मोजणी करून देणार नाही त विकासाला आमचा विरोध नाही परंतु शेतकर्यांचे थडके बांधून विकास करणार तर आमचा विरोध शेतकरी डोळे झाकून जमिनी देतील परंतु आमचे प्रश्न मिटवा अन्यथा शेतकरी अधिका-यांना शेतात पाय ठेवू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मा.खा.राजू शेट्टी यांनी दिला ते आष्टी तालुक्यातील कडा येथे आयोजित राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकरी भुमिपुत्रांचा आक्रोश मेळाव्यात बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले की या राष्ट्रीय महामार्गामुळे जमिनी चे तुकडे होणार आहे.शेतक-यांच्या जमिनी संपादित करणार असून शेतकर्यांना मोबदला किती मिळणार फळबागा, घरे, बोर, विहीर,पाणंद रस्ते यांचे काय या सर्व गोष्टी खुलासा होऊन प्रत्यक्ष मोबदला मिळाल्या शिवाय मोजणी करून देणार नाही शेतकरी अधिका-यांना बांधावर येऊ देणार नाही रस्ता करणार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टक्के वारी घेतल्याशिवाय पैसे देत नाही शेतकर्यांना हेलपाटे मारायला लावतात विकासाला आमचा विरोध नाही शेतकर्यांचे थडके बांधून विकास करणार असाल तर आमचा विरोध आहे.शेतकरी डोळे झाकून जमिन देतील पण गुंतवणूक दार किती पटीत मोबदला देणार हे आधी स्पष्ट करा असा इशारा मा.खा.राजू शेट्टी यांनी दिला यावेळी बीड जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे, नगर जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, आष्टी तालुकाध्यक्ष घनश्याम गिलचे, डॉ. अशोक सरोदे,शहाजी कोकणे, पप्पु सोले, भाऊसाहेब जेवे सावता ससाणे, अनिल ढोबळे, बलभीम सुबरे, बापुराव धोंडे, रविंद्र ढोबळे, चांगदेव एकसिंगे, महेश बळे,महारूद जाधव,
कानिफनाथ काकडे,नितीन कोकणे,रामदास चौधरी, घनश्याम पांडुळे,अशोक चौधरी, सुनिल गि-हे, रेवणनाथ राऊत यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, शेतकरी,कार्यकर्ते उपस्थित होते.
जेव्हा जेव्हा विकासाच्या गप्पा मारल्या जातात तेव्हा पहिला बळी शेतकर्याचा जातो . आमच्या हक्काच्या जमिनी घेताना योग्य तो मोबदला मिळायला हवा. आम्हाला बेदखल करणारा विकास आम्हाला नको . ग्रीनफिल्ड रस्त्यामुळे आमच्या जमिनीचे , गावाचे तुकडे होणार आहे . त्यामुळे त्या शेतात जाण्यासाठी रस्ता कोठे आणि किती असणार . 2013 च्या भुमिअधिग्रहन कायद्यानुसार मोबदला मिळावा.
– मा.खा.राजू शेट्टी