Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनासमाधानकारक -जिल्हात आज बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणारांचा आकडा मोठा

समाधानकारक -जिल्हात आज बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणारांचा आकडा मोठा

बीड -ऑनलाईन रिपोर्टर

बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आज काहीसा कमी आला असून जिल्हात आज बाधितांची संख्या 1015 एवढी आहे तर कोरोना मुक्त रुग्णाचा आकडा बाधितांपेक्षा जास्त असून आज 1317 जण कोरोना मुक्त झाले आहेत हे समाधान कारक असतानाच बाधितांच्या मृत्यू वाढ झाल्याने दुसरीकडे अधिक चिंता वाटत आहे आज 13 जून रोजी 18 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे

जिल्हात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा तेराशे ते पंधराशे च्या आसपास असायचा आज मात्र समाधानकारक आकडे वारी समोर आली असून कोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्याची संख्या जास्त आहे जिल्ह्यातून 4283 लोकांची चाचणी केली असता आज प्राप्त झालेल्या रिपोर्ट मध्ये 3238 जण निगेटिव्ह आले आहेत तर 1015 जण पॉजिटीव्ह आले आहेत. दुसरीकडे आज जिल्हातील कोईड सेंटर मधून 1317 जणांची सुट्टी झाली आहे यांनी कोरोनावर मात केली. चिंतेची बाब येवडीचं की आज दिवसभरात 18 जणांचा मृत्यू झाला

आंबेजोगाई 130, आष्टी 129, बीड 256, धारूर 60, गेवराई 91, केज 139 माजलगाव 51 परळी 45, पाटोदा 38, शिरूर 52, वडवणी तालुक्यात 24 बाधित आठळून आले आहेत

Most Popular

error: Content is protected !!