Tuesday, December 1, 2020
No menu items!
Home बीड बहिणीला भेटण्यासाठी जाणार्‍या भावावर काळाचा घाला रांजणी गावावर शोककळा

बहिणीला भेटण्यासाठी जाणार्‍या भावावर काळाचा घाला रांजणी गावावर शोककळा

गेवराई (रिपोर्टर)- अपघातात जखमी झालेल्या बहिणीला भेटण्यासाठी मोटारसायकलवरून औरंगाबादकडे जाणार्‍या भावावरही काळाने घाला घातला. दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या या अपघातात त्याचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जण जखमी झाल्याची घटना रात्री साडे नऊ वाजता राक्षसभुवन फाटा येथे घडली.
दिवाळीच्या पुर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने गेवराई तालुक्यातील रांजणी येथे शोककळा पसरली. येथील शिवराज बालासाहेब सावंत (वय १९ वर्षे, रा. रांजणी) याच्या चुलत बहिणीचा अपघात गेल्या दोन दिवसांपूर्वी झाला होता. ती औरंगाबाद येथे उपचार घेत होती. तिला भेटण्यासाठी काल सायंकाळी दुचाकीवरून शिवराज सावंत, योगेश सावंत व विजय सावंत हे रांजणीहून औरंगाबादला जात होते. रात्री साडे नऊ वाजता राक्षसभुवन फाट्यावर त्यांच्या दुचाकीला अन्य एका दुचाकीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिवराज बालासाहेब सावंत हा जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत असलेले योगेश सावंत आणि विजय सावंत हे जखमी झाले आहेत. दिवाळीच्या पुर्वसंध्येला सदरची घटना घडली. शिवराज हा ज्या रस्त्याने जात होता त्याच रस्त्याने समोरून विरुद्ध दिशेने मोटारसायकल चालक आपली गाडी भरधाव वेगाने घेऊन आला. वन-वे असताना समोरचा मोटारसायकल चालक हा त्या रस्त्याने आल्याने सदरचा अपघात घडला आणि दुर्दैवाने शिवराज याला आपला जीव गमवावा लागला.

Most Popular

पिसाळलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी जोगेश्वरी पारगांव येथील महिला ठार

पांगुळगव्हाण येथील शेतकरी प्रसंगसावधनाने हल्ल्यात बचावले नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत कायम तात्काळ जेरबंद करण्याची मागणी

बिबट्याला पकडण्यासाठी ताडोबा जंगलातले एक्सपर्ट आष्टीत

बिबट्या पाथर्डी परिसरातून आला, सकाळपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरूआष्टी/बीड (रिपोर्टर)- नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत तिघा जणांचा बळी घेतल्याने आष्टीसह पाटोदा आणि शिरूर तालुक्यात एकच...

महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे सतिष चव्हाण करणार विजयाची हॅट्रीक

सुजान पदवीधर मतदारांची सतिष चव्हाणांनाच सर्वत्र साथगेवराई (रिपोर्टर)-महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, इंदिरा कॉंग्रेस आणि शिवसेना तसेच इतर मित्रपक्षांच्या एकजुटीमुळे सतिष चव्हाण विजयाची...