Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडअक्षय तृतीय निमित्त अंब्याची विक्री लालबाग,दशेरी,बदाम, केशर आंबा बाजारात

अक्षय तृतीय निमित्त अंब्याची विक्री लालबाग,दशेरी,बदाम, केशर आंबा बाजारात


बीड (रिपोर्टर):- साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया निमित्त बाजारात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात आली आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आंबा बाजारात विक्री केला जात असला तरी आजच्या दिवशी आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने व्यापार्‍यांन आधीत विविध जातीचा आंबा विक्रीसाठी आणून ठेवला आहे. लालबाग, दशेरी, बदाम, केशर इत्यादी जातीचे आंबे बीड शहरासह तालुका पातळीवर विक्री होत आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग असला तरी आंब्याची विक्री चांगल्या प्रकारे होत असल्याचे दिसून येत आहे.
फळांचा राजा म्हणून आंब्याकडे पाहिले जाते. मे महिन्यामध्ये आंबा बाजारात विक्रीसाठी येतो. विशेष करून अक्षय तृतीये निमित्त आंब्याची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात येत असते. यावर्षी महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला. त्याचा परिणाम म्हणून आंबे मोठ्या प्रमाणात लगडले. गेल्या २० दिवसापासून आंबा बाजारात विक्री होत आहे. मराठवाड्यात केशर आंब्याची लागवड होत असल्याने जवळपास २० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात केशर आंबा लावण्यात आलेला आहे. केशर व्यतिरीक्त दशेरी, बदाम, लालबाग, आंब्याची बीड शहरासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात आवक आलेली आहे. आज अक्षयतृतीया असल्यामुळे सकाळपासूनच आंबे खरेदी करण्यासाठी ठिकठिकाणी नागरीक दिसून येत होते. सध्या कार्यकाळ असल्यामुळे फळे, भाजीपाला, विक्रीसाठी काही मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. त्याचाही काहीसा परिणाम व्यवसायिकासह शेतकर्‍यांना बसलेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!