Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडखापरपांगरीचे ग्रामसेवक जोशी यांचे दु:खद निधन

खापरपांगरीचे ग्रामसेवक जोशी यांचे दु:खद निधन


बीड (रिपोर्टर):- खापरपांगरीचे ग्रामविकास अधिकारी मनोजराव जोशी यांचे रात्री १० वाजता उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मनोज जोशी हे गेल्या अनेक वर्षापासून खापरपांगरी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वत्र परिचीत होते. त्यांना गेल्या काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान रात्री १० वाजता त्यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जोशी कुटुंबियांच्या दु:खद रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!