Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाउद्या मध्यरात्रीपासून कडक नियमावली

उद्या मध्यरात्रीपासून कडक नियमावली


बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार ठोस पाऊले उचलत आहे. लॉकडाऊन आणखी कडक केले जात आहे. पंधरा मे च्या १२ वाजल्यापासून ते २५ मे च्या १२ वाजेपर्यंत फक्त सर्व औषधालय, दवाखाने, लसीकरण केंद्र, पेट्रोल पंप, टपाल सेवा सुरू राहणार आहे. त्याचबरोबर सकाळी ७ ते १० या दरम्यान परवानगी देण्यात आली. गॅस वितरण दिवसभर सुरू राहिल. बँक ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत केवळ शासकीय व्यवहार, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी धारकांचे व्यवहार, कृषी किंवा वैद्यकीय कारणास्तव व्यवहार केले जाणार आहेत.


महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारने ३१ मे पर्यंत कडक निर्बंध लावलेले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हापातळीवरही ठोस पाऊले उचलले जात आहे. १५ मे ते २५ मे दरम्यान १० दिवस आणखी कडक नियमावली करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जारी केले. १५.५.२०२१ च्या १२ वाजल्यपाासून ते २५ मे २०२१ च्या १२ वाजेपर्यंत सर्व औषधालय, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मासिटीकल्स, फर्मासिटीकल्स कंपन्या, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसीचे वितरण, पेट्रोल पंप, टपाल सेवा इत्यादी अत्यावश्यक सेवेत मोडणार्‍या अस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाही. सकाळी ७ ते १० या दरम्यान दुध विक्रीला परवानगी देण्यात आली. गॅस वितरणासाठी दिवसभर मुभा राहिल.

Most Popular

error: Content is protected !!