Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडयंदाही रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी

यंदाही रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी

घरच्या घरीच राहून नागरीकांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा; कोरोनामुळे घरीच नमाज पठण
बीड (रिपोर्टर):- कोरोनामुळे देशात हाहाकार माजलेला आहे. गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. त्यामुळे सण, उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहे. पवित्र रमजान महिन्याला १४ एप्रिल पासून सुरूवात झाली. रात्री चंद्र दर्शन झाल्यानंतर आज ईद घोषित करण्यात आली. रमजान ईद अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच अदा करत घरच्या घरीच ईदच्या शुभेच्छा दिल्या.
गेल्या मार्च महिन्यापासून देशामध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झालेला आहे. तो अद्यापपर्यंत आटोक्यात आला नाही. काही दिवसापासून देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने यामुळे देश संकटात आहे. आतापर्यंत प्रत्येक सन उत्सव घरच्या घरी साजरे करण्यात आले. एक महिन्यापासून महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आले. १४ एप्रिल पासून रमजान महिन्याला सुरूवात झाली. संपुर्ण महिना लॉकडाऊनमध्ये गेला. त्यामुळे खरेदी करण्यास संधी मिळाली नाही. कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य सरकारने नियमावली ठरवून दिली होती. त्यानुसार नागरीकांनी नियमाचे पालन केले. रात्री चंद्र दर्शन झाल्यानंतर आज ईद साजरी करण्यात आली. अत्यंत साध्या पद्धतीने देशभरामध्ये ईद साजरी झाली. सर्व मुस्लिम बांधवांनी घरीच ईदची नमाज अदा करत घरच्या घरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवारांना सोशल मिडियाच्या माध्यमातून ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कोरोनाचा संकटकाळ लवकर जावो अशी प्रार्थनाही करण्यात आली.

Most Popular

error: Content is protected !!