Friday, August 6, 2021
No menu items!
Homeकोरोना113 सडकफिर्‍यांची टेस्ट; 13 जण आले पॉझिटिव्ह

113 सडकफिर्‍यांची टेस्ट; 13 जण आले पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक लॉकडाऊन करण्यात आलेला असतानाही विविध कारणे दाखवून लोक रस्त्यावर येत आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या सडकफिर्‍यांची अँटीजेन टेस्ट करण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. बीड शहरात आठ ठिकाणी सडकफिर्‍यांच्या अँटीजेन टेस्ट केल्या जातात. आज 113 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 13 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.


विविध कारणे देऊन लोक रस्त्यावर येत आहेत. त्यांच्यामुळेच कोरेानाचा संसर्ग वाढत आहे. कडक लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा आणि रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे मात्र विविध कारणे पुढे करत सडकफिरे रस्त्यावर फिरत आहेत. या सडकफिर्‍यांमुळेच जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत नाही. आतापर्यंत शेकडो सडकफिरे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज दुपारपर्यंत बीड शहरात आठ ठिकाणी सडकफिर्‍यांच्या टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये 13 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!