Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeक्राईमपांगरी रोडवरून विद्युत मोटार पळविली

पांगरी रोडवरून विद्युत मोटार पळविली


इंडिकेटरवरून चोरट्याची ओळख पटली
बीड (रिपोर्टर):- पांगरी रोडवरील गिराम नगर भागातून विद्युत मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरू नेली. मोटार घेऊन जात असताना चोरट्याच्या गाडीचे इंडिकेटर फुटून पडले. यावरून चोरट्याच्या गाडीची ओळख पटली. याची माहिती संबंधित मालकाने शिवाजीनगर पोलीसांना दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नारायण पगारे (रा. गिराम नगर पांगरी रोड) यांच्या घरातून पहाटे चोरट्याने 35 हजार रुपये किमतीची मोटार चोरून नेली. मोटार घेऊन जात असताना चोरट्याच्या गाडीचे इंडिकेटर घटनस्थळी तुटून पडले. या इंडिकेटरवरून चोरट्याच्या गाडीची ओळख पटली. याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याला पगारे यांनी दिली. त्यानुसार संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!