Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनामेगा व्हिजन खासगी कंपनीचे रिपोर्ट 72 तासानंतरही येत नाहीत

मेगा व्हिजन खासगी कंपनीचे रिपोर्ट 72 तासानंतरही येत नाहीत


बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने कोरोनाची चाचणी करण्याचे कंत्राट काही खासगी कंपनींना दिले. बीड येथे मेगा व्हिजन नावाची कंपनी रुग्णांचे स्वॅब घेऊन ते पुण्याला पाठवते, मात्र 72 तास उलटून गेले तरी या लॅबचे स्वॅब रुग्णांना उपलब्ध होत नसल्याने रुग्णांमध्ये घालमेल सुरू झाली. आपण पॉझिटिव्ह आहोत की, निगेटिव्ह याबाबत त्यांच्या मनात शंका-कुशंका निर्माण झाल्या आहेत. याबाबत संबंधित कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नसल्याचे दिसून येत आहे.


महाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी खासगी लॅबला कंत्राट देण्यात आले. मात्र खासगी लॅबचे रिपोर्ट वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. बीड येथील स्वॅब तपासणीचे कंत्राटही पुणे येथील मेगा व्हिजन या कंपनीला दिले होते. 12 मे रोजी अनेकांनी स्वॅब दिलेले आहेत. मात्र त्यांचे रिपोर्ट आलेले नाहीत. 72 तास उलटून गेले तरी आपले रिपोर्ट कसे आले नाही, याची घालमेल संबंधितांना होत आहे. आपण पॉझिटिव्ह आहोत की, निगेटिव्ह आहोत याची चिंता त्यांना सतावते. संबंधितांना निगेटिव्ह असो वा पॉझिटिव्ह मॅसेज पाठवला जातो, मात्र या कंपनीने कसलाही मॅसेज पाठवला नाही. रिपोर्ट संबंधी संशयित आयटीआयसह इतर विभागाच्या कर्मचार्‍यांशी संवाद साधत आहेत. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर दिले जात नसल्याने स्वॅब दिलेल्यांना अशा पद्धतीचा मन:स्ताप सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!