Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजपासून दहा दिवस कडक निर्बंध जिल्हाधिकारी रविंद्र जगताप रस्त्यावर

आजपासून दहा दिवस कडक निर्बंध जिल्हाधिकारी रविंद्र जगताप रस्त्यावर


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने दहा दिवस जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावलेले आहेत. या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला सक्तीच्या सूचना बजावण्यात आलेल्या आहेत. बीड शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस कर्मचारी प्रत्येक वाहन धारकांची चौकशी करत आहे. जे नागरीक नियमाचे उल्लंघन करतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी रस्त्यावर उतरून नियमाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी केली.
महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत नसल्याने राज्य सरकारने 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहिर केलेले आहे. लॉकडाऊन असतांनाही अनेक नागरीक नियमाचे उल्लंघन करत आहे. जे लोक नियम पाळत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. बीडमध्ये दहा दिवस कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मेडिकल दवाखाने वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. आदेशाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला दिलेले आहेत. शहरातल्या विविध भागात पोलीस येणार्‍या-जाणार्‍या वाहन धारकांची चौकशी करतात. जे नागरीक दोषी आढळतात त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. नियमाची योग्य पद्धतीने अंमल-बजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी यांनी रस्त्यावर उतरून विविध ठिकाणी जावून पाहणी करत आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!