Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनागेवराईत नियमांचे उल्लंघन करणार्‍या सात दुकानांना सील

गेवराईत नियमांचे उल्लंघन करणार्‍या सात दुकानांना सील


पोलीस आणि न.प.प्रशासनाची कारवाई
गेवराई (रिपोर्टर) पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेच्या वतीने सकाळपासून नियम तोडणार्‍या दुकानांना सील ठोकण्याची मोहीम हाती घेतली असून सकाळपासून एकूण 7 दुकानांना सील ठोकत चौका चौकात खडा पहारा रुरू असून कारवाया सुरू आहेत.


कोविडच्या आकडेवारी मध्ये मराठवाड्यात बीड जिल्हा अव्वल असून याबाबत जिल्हाधिकारी यांनी कालपासून पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले असल्याने आज गेवराई शहरात सकाळपासून पोलिसांनी नाकेबंदी करत खडा पहारा सुरू केला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार व न.प.मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्यासह सपोनि प्रफुल्ल साबळे, संदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ,मनीषा जोगदंड,अर्चना भोसले, शरद बहिरवल,हनुमान जावळे, अमोल खटाने, नाथा कावळे, पोतदार, विशाल प्रधान यांच्यासह न.प.कर्मचार्‍यांनी या कारवाया केल्या आहेत. दरम्यान प्रशासनाचे निर्बध चालू आहेत तोपर्यंत या दुकांनांचे सील कायम राहाणार असल्याचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितले.

Most Popular

error: Content is protected !!