Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडपावसाचं नव्हे तर नालीचं पाणी वाहतय रस्त्यावरून खडकपुरा ते चांदणी चौकातील विदारक...

पावसाचं नव्हे तर नालीचं पाणी वाहतय रस्त्यावरून खडकपुरा ते चांदणी चौकातील विदारक अवस्था


बीड (रिपोर्टर):- नगर पालिकेकडून स्वच्छतेचे मोठमोठे दावे केले जातात. प्रत्यक्षात मात्र कोठेही स्वच्छता दिसत नाही. तुंबलेल्या नाल्या वेळेवर काढल्या जात नाहीत. त्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावर वाहते. खडकपुराते चांदणी चौकातील नालीचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. पावसाळ्यात ज्या प्रमाणे रस्त्यावरून पाणी वाहते त्याच प्रमाणे नालीचे पाणी वाहू लागल्याने या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


बीड शहरातल्या विविध भागात घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरलेले आहे. नाल्यावेळेवर काढल्या जात नसल्याने नाल्याचे पाणी अनेक दुकानदाराच्या दुकानात घुसत आहे. बीड शहरातील खडकपुरा ते चांदणी चौकमध्ये नाल्याची वाईट अवस्था दिसून आली. पावसाळ्यात ज्या प्रमाणे रस्त्यावरून पाणी वाहते त्याच प्रमाणे नालीचे पाणी १२ ही महिने रस्त्यावरून वाहत आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे येणार्‍या-जाणार्‍या नागरीकांना त्रास तर होतच आहे मात्र त्या भागातील नागरीकांचे आरोग्य देखिल धोक्यात आले आहे. नगर पालिकेला नाल्या स्वच्छ करण्यासाठी जाग येणार कधी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!