Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडपरळीपरळीत गावठी पिस्टल बाळगणार्‍या आरोपीस अटक

परळीत गावठी पिस्टल बाळगणार्‍या आरोपीस अटक


परळी (रिपोर्टर)ः- परळी शहरातील स्वाभिमाननगर मधील एकाकडे गावठी पिस्टल असल्याचे गुप्त माहिती मिळताच परळी शहर डी.बी.पथकाचे भास्कर केंद्रे यांनी सापळा रचुन एकास अटक केली. त्यांच्याकडुन गावठी पिस्टल मँग्जीनसह जुने वापरते जप्त केले आहे. परळी शहर डी.बी.पथकाचे या कामगिरीने परळीत सर्वत्र कौतुक होत आहे.
दि.१६.०५.२०२१ रोजी रात्री १० चे सुमारास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, परळी येथील स्वाभिमाननगर येथील एक इसम थांबला आहे. त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे असी खात्री लाईक बातमी मिळाल्याने गोपनीय माहिती दिलेल्या वर्णणावरुन त्या इसमास ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव संदीप भास्कर फड (वय ३० वर्ष रा.स्वाभिमाननगर परळी वैजनाथ) असे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला आतुन ठेवलेला एक गावठी पिस्टल मॅगझीनसह असलेले मिळुन आले. त्यांच्या कब्जात असलेल्या गावठी पिस्टलचे लायसन्स विचारले असता त्यांनी त्यांचेकडे शस्त्र बाळगण्याचे कोणतेही परवाना नसल्याचे सांगितले. त्यांच्या विरुध्द भास्कर केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.७५/२०२१ कलम ३/२५ भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही परळी शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाचे भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे, सुंदर केंद्रे, श्रीकांत राठोड, शरद सुर्यवंशी यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस जमादार चव्हाण हे करत आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!