Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडकोरोनाने माजलगाव येथील परिचारिकेचा मृत्यू

कोरोनाने माजलगाव येथील परिचारिकेचा मृत्यू


बीड (रिपोर्टर):- माजलगाव येथील शासकीय कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या एका ३२ वर्षीय परिचारीकेला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान रात्री सदरील परिचारीकेचा मृत्यू झाला.


रेणुका अभिमन्यू वाघमारे (वय ३२) या माजलगाव येथील शासकीय कोव्हिड सेंटरमध्ये परिचारीका म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर माजलगाव येथील राजेभोसले रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्याने औरंगाबाद येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचारा दरम्यान रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने माजलगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्‍चात, पती, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडिल, बहिण, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्या सायं.दै.बीड रिपोर्टरचे सहसंपादक रमाकांत गायकवाड यांच्या मेहुणी होत्या. वाघमारे कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!