Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनाप्रशासनाने ग्रामीण भागाकडेही लक्ष द्यावे ग्रामीण भागात कोरोनाचा जास्त फैलाव -थावरे

प्रशासनाने ग्रामीण भागाकडेही लक्ष द्यावे ग्रामीण भागात कोरोनाचा जास्त फैलाव -थावरे


बीड (रिपोर्टर):- शहरी भागानंतर आता कोरोना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. ग्रामीण भागाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून प्रशासनाने ग्रामीण भागाकडे लक्ष देवून ग्रामीण भागातील नागरिकांनाही काटेकरोपणे नियमाचे पालन करावे तसे आदेश बजावेत शासकीय कर्मचार्‍यांनी गावागावात जावून जनजागृती करावी नसता भीषण परिस्थिती उद्भवू शकेल असे गंगाभीषण थावरे यांनी म्हटले आहे.


गेल्या आठ-दहा दिवसात माजलगाव तालुक्यातील अनेक गावातील वयोवृद्धासह तरूण कोरोनाने मरण पावलेले आहे. प्रशासन शहरी भागातच जनजागृती करून त्या ठिकाणी नियमाचे पालन करण्यास भाग पाडत आहे. मात्र ग्रामीण भागात नियमाचे पालन होत नाही. १४४ कलम ग्रामीण भागात नाही का? एखाद्या गावात २-४ पेशंट निघाल्यानंतर त्या गावातील सर्व गावकर्‍यांची अँटीजेन टेस्ट करणे गरजेचे आहे. असे न करता प्रशासन फक्त शहरी भागाकडे लक्ष देवून ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून याला वेळीच रोख लावावा नसता गंभीर परिस्थिती निर्माण होईल असा इशारा शेतकरी संघटनेचे गंगाभीषण थावरे यांनी दिला आहे.

Most Popular

error: Content is protected !!