Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनानियमाचं उल्लंघन करणार्‍यांना प्रशासनाचा दणका दुपारपर्यंत १२० जणांवर दंडात्मक कारवाई

नियमाचं उल्लंघन करणार्‍यांना प्रशासनाचा दणका दुपारपर्यंत १२० जणांवर दंडात्मक कारवाई


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले असले तरी अनेक नागरीक रस्त्याने विनाकारण फिरत आहेत. अशा नागरीकांवर दंडात्मक कारवाई सुरू असून आज दुपारपर्यंत १२० जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला आहे. सदरील ही कारवाई छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चर्‍हाटा फाटा यासह अन्य ठिकाणी केली जात आहे.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन केलेले आहे. जिल्हा प्रशासनाने ही २५ मे पर्यंत कडक निर्बंध लावले असून निर्बंध असतांनाही अनेक नागरीक रस्त्याने विनाकारण फिरत आहेत. अशा सडकफिर्‍याविरोधात कारवाईची मोहिम सुरू करण्यात आली. ज्यांना खरच अत्यावश्यक काम आहे अशांना मात्र विचारपूस करून सोडुन दिले जात आहे. जे विनाकारण फिरतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. दुपारपर्यंत १२० जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून २०० ते ५०० रूपये या प्रमाणे दंड वसुल करण्यात आला.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!