Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडवारे अच्छे दिन! खताचं पोतं ७०० ने वाढलं मोदींचा शेतकरी सन्मान नव्हे...

वारे अच्छे दिन! खताचं पोतं ७०० ने वाढलं मोदींचा शेतकरी सन्मान नव्हे शेतकरीच गहाण


बीड (रिपोर्टर):- शेतकरी सन्मानाच्या नावाखाली दोन हजार टिकल्या घेऊन टिर्‍या बडवून घेणार्‍या केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दुपटीने किमती वाढवून शेतकर्‍यांच्या शेत नव्हे तर शेतकर्‍यांनाच गहाण ठेवण्याचा विढा उचलल्याचे दिसून येत असून लॉकडाऊनमुळे आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी रासायनिक खताच्या भाववाढीने चिंतातूर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांचा मीच तारणहार असल्याचा दावा करत असले तरी खतांमध्ये गेलेल्या भरमसाठ वाढीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार तारणहार नसून मारक असल्याची जळजळीत प्रतिक्रिया शेतकर्‍यातून व्यक्त होत आहे.
अच्छे दिनच्या गुहारवर स्वार झालेल्या नरेंद्र मोदी सरकारने गेल्या सात वर्षाच्या कालखंडात सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांना ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तूंचे भाव गगनाला भिडवले आहेत. गेल्या सहा महिन्याच्या कालखंडात पेट्रोल-डिझेलचा शंभरीतला भडक्यात सर्वसामान्य होरपळत असतानाच आता आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकर्‍याला रासायनिक खताच्या भाववाढीत भरडण्याचे धोरण मोदी सरकारने आखले आहे. गेल्या दोन महिन्याच्या कालखंडात दोन ते तीन वेळा खतांची भाववाढ झाली. आता खताचं पोतं दुपटीने किंमत घेऊन खरेदी करावा लागणार आहे. आम्ही शेतकर्‍यांचे तारणहार आहोत, शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली वर्षाला ६ हजार देत आहोत. शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रति दोन हजार रुपये टाकून शेतकरी सन्मानाच्या बाता मारत डांगोरा पिटवणार्‍या मोदी सरकारचे खायचे दात शेतकर्‍यांना आता दिसले आहेत. खरीप हंगाम अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला असतानाच रासायनिक खताचे भाव गगनाला भिडल्याने शेतकर्‍यात प्रचंड संताप आहे. गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात लॉकडाऊनमुळे शेती मालाला व्यवस्थित भाव मिळाला नाही. त्यात रासायनिक खतांची दुपटीने वाढ पाहून शेतकर्‍यांच्या तळपायाची आग मस्तकाला जात असून हा शेतकरी सन्मान नव्हेतर केंद्राकडून शेतकरी गहाण ठेवण्याचा प्रकार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यांतून व्यक्त केली जात आहे.

रासायनिक खताचे नवे व जुने दर (प्रति ५० कि. बॅग)

खताचा प्रकार जुने दर नवीन दर
इफ्को ………………………………………
१०:२६:२६ ११७५ १७७५
१२:३२:१६ ११९० १८००
२०:२०:० ९९५ १३५०
डीएपी ११८५ १९००
आयपीएल ……………………………………
डीएपी १२०० १९००
२०:२०:० ९७५ १४००
पोटॅश ८५० १०००
महाधन …………………………………….
१०:२६:२६ १२७५ १९२५
(स्मार्ट टेक)
२४:२४:० १३५० १९००
२०:२०:१३ १०५० १६००
जीएसएफसी (सरदार) ………………………..
१०:२६:२६ ११७५ १७७५
१२:३२:२६ १११९ १८००
डीएपी १२०० १९००
सुपर फॉस्फेट ३७० ४७०
सुपर फॉस्फेट ४०० ५००

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!