Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाची उसळी बीड...

जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाची उसळी बीड तालुक्यात सर्वाधिक 330

बीड (रिपोर्टर) कोरोनाच्या समुह संसर्गाचा आलेख काल दोनशे ते तीनशे कमी आल्यानंतर आज पून्हा बीड जिल्ह्यात कोरोनाने उसळी मारली असून तब्बल 1118 नवीन कोरोनाबाधीत मिळून आले आहेत. काल 4403 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आज या स्वॅबचा अहवाल हाती आला तेव्हा बीड तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक तीनशेपेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यात कोरोना समुह संसर्गाचा आलेख वाढत चालला आहे. काल बर्‍याच दिवसानंतर हजाराच्या आत बाधीत सापडले होते. आज मात्र हा आकडा पून्हा हजाराच्या पुढे गेला आहे. काल 4403 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असता 1118 पॉझिटिव्ह मिळून आले तर 3285 जण निगेटिव्ह आले. यात अंबाजोगाई 67, आष्टी 96, बीड 330, धारूर 80, गेवराई 86, केज 105, माजलगाव 96, परळी 35, पाटोदा 125, शिरूर 166 तर वडवणी तालुक्यात 32 बाधीत मिळून आले आहेत. आज सर्वाधिक बीड तालुक्यात 330 रूग्ण आढळून आले असून त्यामध्ये ग्रामीण भागातील बाधीतांची संख्या मोठी आहे

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!