Thursday, December 3, 2020
No menu items!
Home व्यापार भारतात येणार तब्बल ३०,००० कोटींची परदेशी गुंतवणूक, 'या' शेअर्सला होणार फायदा

भारतात येणार तब्बल ३०,००० कोटींची परदेशी गुंतवणूक, ‘या’ शेअर्सला होणार फायदा

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊन नंतर आता भारतीय शेअर बाजारात तेजी पहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे भारतीय बाजारात मोठी परदेशी गुंतवणूक येणार आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, भारतीय बाजारात गुंतवणुकदारांना कमाईची चांगली संधी निर्माण होऊ शकते. मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया यांच्या मते, इंडेक्समध्ये भारताचा वाटा हा ८.२५ टक्क्यांवरुन ९.२५ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

चंदन तापडिया यांच्या मते, एमएससीआयमधील बदलांमुळे भारतीय बाजारात जवळपास ४ अब्ज डॉलर्स म्हणजेच २९,४८१ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक भारतीय बाजारात येण्याची शक्यता आहे. हे पैसे कुठल्या शेअर्समध्ये जाण्याची शक्यता आहे आणि त्याचा फायदा कसा होईल हे पाहूयात…

 1. कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) – अंदाजित गुंतवणूक ५,०७९ कोटी रुपये
  टेक्निकल व्ह्यू: या शेअरने १,५०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आता हा शेअर आधी १,६७५ रुपये आणि नंतर १,७४० रुपयांच्या दिशेने वाटलाच करु शकतो.
 2. बजाज फायनान्स (Bajaj Finance) – अंदाजित गुंतवणूक १,२२३ कोटी रुपये 
  टेक्निकल व्ह्यू: हा शेअर ३,३७० रुपयांवर पोहोचला आहे. पुढे हा शेअर ३,७५० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
 3. एशियन पेंट्स (Asian Paints) – अंदाजित गुंतवणूक – १,२०९ कोटी रुपये 
  टेक्निकल व्ह्यू: हा शेअर गेल्या आठ वर्षांपासून गुंतवणुकदारांना खूपच चांगला परतावा देत आहे. हा शेअर २,६०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. 
 4. नेस्ले इंडिया (Nestle India) – अंदाजित गुंतवणूक – १,०४२ कोटी रुपये
  टेक्निकल व्ह्यू: एफएमसीजी शेअर्समध्ये खूपच तेजी आणि मजबूत स्थिती दिसून येत आहे. नेस्लेचा शेअर १६,५०० रुपयांचा टप्पा ओलांडल्यावर आता १८,५०० रुपयांपपर्यंत पोहोचू शकतो.
 5. एमआरएफ (MRF) – अंदाजित गुंतवणूक – ९७२ कोटी रुपये 
  टेक्निकल व्ह्यू: या शेअरमध्ये व्हॉल्यूम खूपच कमी असतो. या शेअरने ६७,७०० रुपयांचा टप्पा ओलांडल्यावर ७३,५०० रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 6. अशोक लेलँड (Ashok Leyland) – अंदाजित गुंतवणूक – ७६० कोटी रुपये 
  टेक्निकल व्ह्यू: या शेअरमध्ये सलग तेजी पहायला मिळत आहे. गुंतवणुकदार या शेअरमध्ये ७३ रुपयांच्या भावावर गुंतवणूक वाढवत आहेत. त्यानंतर ८८ रुपये आणि मग ९५ रुपयांचा टप्पा ओलांडताना पहायला मिळण्याची शक्यता आहे. 

Most Popular

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...

माजी मंत्री पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

बीड (रिपोर्टर)- मला सर्दी खोकला आणि ताप असल्याने मी जबाबदारी स्वीकारून स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी...

गावागावात नरभक्षी सन्नाटा अफवामुळे संभ्रम

किन्ही गावातील काही रहिवाशांचे पलायन, लहान मुलांनी स्वत:ला कोंडून घेतले; सायंकाळी पाच नंतर घराची दारे बंद करून घेतात ग्रामस्थसंपुर्ण रात्र जीव मुठीत...

पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवडे पाटील यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार

  पिंपळनेर - रिपोर्टर . बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवाडे पाटील यांचे...