Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडप्रशिक्षण कालावधीतच तहसीलदार वमने यांना उपविभागीय अधिकार्‍यांच्या नोटीसांवर नोटीसा

प्रशिक्षण कालावधीतच तहसीलदार वमने यांना उपविभागीय अधिकार्‍यांच्या नोटीसांवर नोटीसा


बीड (रिपोर्टर):- बीडचे तहसीलदार शिरीष वमने हे बीड येथे प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. प्रशिक्षण कालावधीत गौण खनिज विभाग आणि वाळूमध्ये अनेक चुका केल्याने उपविभागीय अधिकार्‍यांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये अनेक प्रकरणांमध्ये वमने यांनी खुलासे करावे, अशा नोटीसा बजावलेल्या आहेत.


प्रशिक्षण कालावधीमध्ये कोणत्याही महसूल अधिकार्‍याचे काम हे चोख असते. मात्र वमने हे प्रशिक्षण कालावधीतच ओव्हर शाईनिंग करत अनेक वाळुच्या गाड्या पकडलेल्या आहेत. मात्र पुर्ण कारवाई न होता या गाड्या सोडून दिल्या. सोबतच अनेक मुरुम आणि दगडाची वाहतूक करणार्‍या गाड्या पकडून त्या तहसील कार्यालयात लावण्यात आल्या मात्र काही गाड्यांवर त्यांच्याकडून चुकून कारवाई झाली होती तर काही गाड्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजमाप न केल्याने चुका निदर्शनास आल्याने बीड विभागाचे उपविभागीय अधिकारी टिळेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी राऊत यांनी तहसीलदार वमने यांच्या अनेक प्रकरणात चौकश्या लावलेल्या आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!