Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडमेंटनेसच्या नावाखाली शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत

मेंटनेसच्या नावाखाली शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत


बीड (रिपोर्टर):- महावितरणच्या वतीने शहरात मान्सूनपुर्व मेंटनेसचं काम सुरू करण्यात आलं आहे. मात्र मेंटनेसच्या नावाखाली खंडीत केलेला विद्युत पुरवठा पुन्हा लवकर सुरळीत केला जात नाही. त्यामुळे भर उन्हाळ्यात गर्मीने लोकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. फॅन, कुलर बंद असतानाही कोरोनामुळे लोकांना घरातच बसावे लागत आहे. त्यामुळे महावितरणने खंडीत केलेला विद्युत पुरवठा काम झाल्यानंतर तात्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.
सध्या महावितरणच्या वतीने मान्सूनपुर्व मेंटनेसचे काम सुरू आहे. या वेळी शहरातील लोंबकळलेल्या तारा दुरुस्त केले जातात, वाढलेले झाडे तोडले जातात. रोहीत्र दुरुस्त करून घेतले जातात जेणेकरून पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी मान्सूनपुर्व दुरुस्तीचे काम सध्या महावितरणकडून युद्धपातळीवर सुरू आहे. अशा वेळी एका भागात हे काम सुरू असताना त्या भागातील विद्युत पुरवठा बंद केला जातो. तेथील काम पुर्ण झाल्यानंतरही त्या भागाचा विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत केला जात नाही. सध्या सुर्य आग ओकत असल्याने प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे घरात बसणे अवघड झाले आहे. त्यामुळे महावितरणने मेंटनेसचे काम पुर्ण झाल्यास तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे. याबाबत महावितरणचे भारंबे म्हणाले की, सध्या मान्सूनपुर्व मेंटनेसचे काम सुरू आहे. त्यामुळे काही भागातील विद्युत पुरवठा खंडीत करावा लागतोय, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!