Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमसख्ख्या भावांचा खून करणारा आरोपी जेरबंद

सख्ख्या भावांचा खून करणारा आरोपी जेरबंद


बीड (रिपोर्टर):- जुन्या भांडणाची कुरापत काढून दोन सख्ख्या भावांवर कुर्‍हाडीने वार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री तालुक्यातील नागापूर खुर्द येथे घडली होती. या घटनेने जिल्हा हादरून गेला. हत्या करून फरार झालेला आरोपी परमेश्वर साळुंके हा नागापूर खुर्द येथील नदीपात्रात असल्याची माहिती पिंपळनेर पोलीसांना मिळताच पोलीसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सदरील कारवाई पिंपळनेर पोलीस ठाण्याचे शरद भुतेकर, पीएसआय सानप, सुरवसे, कारले, सानप यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!