Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईलुखामसला येथील ट्रान्सफार्मर तात्काळ बसवा, नसता परिणामाला सामोरे जावे लागेल - आ.पवार

लुखामसला येथील ट्रान्सफार्मर तात्काळ बसवा, नसता परिणामाला सामोरे जावे लागेल – आ.पवार


महावितरण कार्यालयात बैठक घेत संबंधित अधिकार्‍यांना सुनावले खडे बोल; उपोषणाचा दिला ईशारा
गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील लुखा मसला सबस्टेशन वरील ट्रान्सफर्मर गेल्या पंधरा दिवसापासून जळलेला असून वेळोवेळी सूचना देऊनही महाविरण विभागाकडून दुर्लक्ष होत असून याबाबत आ.लक्ष्मण पवार यांनी थेट महावितरण कार्यालयात जाऊन संबंधित अधिकार्‍यांची भेट घेत खडे बोल सुनावले व येत्या 3 दिवसात हा ट्रान्सफार्मर तात्काळ बसवा नसता मला शेतकर्‍यांसह उपोषण करणार असल्याचे सांगत महावितरण विभागाला होणार्‍या गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल असा ईशारा आ.लक्ष्मण पवार यांनी यावेळी दिला.


तालुक्यातील लुखा मसला येथील सबस्टेशन येथील ट्रान्सफार्मर जळून पंधरा दिवसाचा कालावधी लोटला आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तर जनावरांचेही हाल होत आहेत. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करत मागणी करूनही महावितरण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आ.लक्ष्मण पवार यांनी आज या परिसरतील शेतकर्‍यांसमवेत थेट महाविरण कार्यालय गाठून या ठिकाणी बैठक घेत संबंधित अधिकार्‍यांना खडे बोल सूनावले. यावेळी अधिकार्‍यांशी बोलताना ते म्हणाले की,शेतकर्‍यांचा व मुक्या प्राण्यांचा तळतळाट घेऊ नका, सध्या कोविड सारख्या महामारीमुळे शेतकरी आधीच मोठ्या संकटाचा सामना करत असतानाच आपल्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी जास्तच उदवस्थ होत आसल्याचे सांगत झाप झाप झापले. व येत्या 3 दिवसाच्या आत हा ट्रान्सफार्मर तात्काळ बसवा नसता परिसरातील शेतकर्‍यांना सोबत घेऊन दि.22 मे रोजी पासून आपण उपोषणाला बसणार असल्याचा ईशारा देत संबंधित अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी उप कार्यकारी अभियंता शिवलकर, माजी उपसभापती सचिन मोटे, किनगावचे सरपंच अरुण चाळक,बाप्पासाहेब यादव, प्रभाकर चाळक, प्रभाकर येवले, सतीश चव्हाण, संजय आंधळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. दरम्यान येत्या 2 दिवसात हा ट्रान्स्फर बसवून या परिसरातील विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन अभियंता शिवलकर यांनी आ.पवार यांना दिले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!