Monday, June 14, 2021
No menu items!
Homeबीडकेजच्या तहसीलसमोर शेकापने केली खताची होळी खताच्या दरवाढीमुळे शेतकर्‍यात संताप

केजच्या तहसीलसमोर शेकापने केली खताची होळी खताच्या दरवाढीमुळे शेतकर्‍यात संताप


केज (रिपोर्टर):- केंद्र सरकारने रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्याने शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारने तात्काळ खताची दरवाढ रद्द करावी, या मागणीसाठी आज शेतकरी कामगार पक्षाने तहसील कार्यालयासमोर खताची होळी करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. सदरील हे आंदोलन सोशल डिस्टन्स पाळून करण्यात आले. या वेळी मोहन गुंड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
केंद्र सरकारने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताच्या किमतीत भरमसाठ वाढ केली. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारने खताची दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी केजच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर खताची होळी करून केंद्र सरकारचा निषेध केला. सोशल डिस्टन्स पाळून कार्यकर्त्यांनी आज हे आंदोलन केले असून या वेळी शेकापचे मोहन गुंडसह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!