Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनामहामारीत ग्रामीण भागाचे होताहेत मसनवाटे अधिकार्‍यांनो, मरगळ झटका; प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण...

महामारीत ग्रामीण भागाचे होताहेत मसनवाटे अधिकार्‍यांनो, मरगळ झटका; प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर-कर्मचारी वाढवा


ज्या गावात बाधित रुग्ण आढळले ते ते भाग कंटेनमेंट झोन करा
गावागावात अँटीजेन टेस्ट करा
सडकफिर्‍यांच्या चाचण्या बंद करू नका
बीड (रिपोर्टर):- कोरोना समुह संसर्गाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात हाहाकार उडवून सोडला आहे. गंभीर अणि अतिगंभीर रुग्णात सातत्याने वाढ होत असल्याने बीड जिल्ह्यात मृत्युचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. सदरच्या गंभीर परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने मरगळ झटकून ग्रामीण भागात चाचण्या वाढवणे गरजेचे असून प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णलयामध्ये डॉक्टरसह कर्मचार्‍यांची उपलब्धता तात्काळ करून देणे गरजेचे असून शहरी भागात सुरू असलेल्या सडकफिर्‍यांच्या अँटीजेन चाचण्या बंद न करता त्या सुरुच ठेवण्यात याव्यात कारण सडकफिर्‍यांच्या अँटीजेन चाचण्यामध्ये 10 टक्के बाधीत आढळून येत आहेत. हा दहा टक्क्यांचा आकडा जिल्ह्यातील कोरोना वाढण्यासाठी मोठा आहे.


बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यात बाधितांचे सर्वाधीक मृत्यु झाल्याने जिल्हावासियात कोरोनाबाबत प्रचंड दहशत आणि भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत कोरोनाने आता ग्रामीण भागात हातपाय पसरून तेथील नागरिकांना आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. जिलह्यातील बहुतांशी गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण 30 पेक्षा जास्त आढळून येत आहेत. अशा गावांमध्ये अँटीजेन चाचण्या वाढवून कोरोनाबाबत जनजागृती करून कोरोनाला अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने मरगळ झटकून कामाला लागावे, महाराष्ट्रात जेव्हा लॉकडाऊन नव्हते तेव्हापासून बीड जिल्ह्यात लॉकडाऊन असताना अद्यापही कोरोना आटोक्यात येत नाही. याला सर्वसामान्य जनता जेवढी जबाबदार आहे तेवढेच प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे. ग्रामीण भागातला कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ग्रामीण रुग्णालयांमध्ये तात्काळ कोरोना उपाययेाजनांचे साहित्य, डॉक्टर आणि कर्मचारी वाढवावेत, ज्या गावात 20 पेक्षा जास्त रुग्ण असतील त्या गावात कंटेनमेंट झोनसह अन्य उपाययोजना कराव्यात, अ‍ॅन्टीजन टेस्ट वाढवाव्यात, स्थानिक पातळीवर निरोगी तरुणांचे दल तयार करून कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने गावपातळीवर लोकांचे प्रबोधन करावे, आजही लोक कोरोनाबाबत भीती बाळगून असून ते टेस्टसाठी येत नाहीत. दुसरीकडे शहरी भागात सडकफिर्‍यांसाठी अँटीजेन टेस्ट सुरू आहेत. त्या अँटीजेन टेस्ट बीड जिल्हा प्रशासन बंद करण्याच्या मुडमध्ये आहे. परंतु जिल्हा प्रशासनाने गाफील न राहता या टेस्ट सुरुच ठेवाव्यात. कारण आजपयर्ंंत दहा टक्क्याच्या आसपास या टेस्टेमध्या बाधीत आढळून आले आहेत. हाच दहा टक्क्यांचा आकडा कोरोनाचा प्रसार करण्यासाठी पुढे महत्वाचा ठरत चालला आहे. आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने आणि अधिकार्‍यांनी गांभीर्याने ग्रामीण भागातला कोरोना हद्दपार करण्याइरादे उपाययोजनांवर भर द्यावा, अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!