Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडकळपातून चुकलेल्या हरणाच्या पाडसाला इनामदार यांनी दिले जीवदान

कळपातून चुकलेल्या हरणाच्या पाडसाला इनामदार यांनी दिले जीवदान


बीड (रिपोर्टर):- माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी (पात्रुड) शिवारात एक हरणाचं पिल्लू कळपातून चुकल्याने ते इकडेतिकडे सैरावैरा पळू लागला. या पाडसाच्या पिल्लाला माजी नगरसेवक हाफिज इनामदार यांनी जीवदान देत त्याला वनविभागाच्या स्वाधीन केले.
बीड येथील माजी नगरसेवक हाफिज इनामदार हे माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी (पात्रुड) येथील आपल्या शेतामध्ये गेले होते. त्याठिकाणी कळपातून हरणाचं पिल्लू पाळस चुकलं आणि ते सैरवैर पळू लागलं. या पाळसाच्या पिल्लाची कुणी शिकार करू नये म्हणून इनामदार यांनी या पिल्लाला जवळ घेत त्याचे प्राण वाचवले. सदरील या पिल्लाला वन विभागाच्या स्वाधीन केले. या वेळी नगरसेवक आमेर अण्णा, शोएब इनादार, मुनतजीब इनामदार, राजू सोहेल उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!