अंबाजोगाई (रिपोर्टर):- अंबाजोगाई तालुका वकील संघाची वार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली . ही निवडणूक दरवर्षी अत्यंत प्रतिष्ठेची व चुरशीची होत असते. त्याचप्रमाणे याहीवर्षी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची अशी केली होती.संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. मागील दहा वर्षांपासून अध्यक्ष पदी विराजमान असलेले जेष्ठ विधीज्ञ ऍड शरद अण्णा लोमटे यांच्या विरोधात अत्यंत तरुण व नव्या उमेदीचे ऍड अशोक कवडे यांनी आपला पॅनल उभा केला होता . मागच्या सलग दहा वर्षांपासून अध्यक्ष असलेले ऍड. शरद अण्णा लोमटे बार कोन्सिल चांगल्या पद्धतीने हाताळत होते .मात्र त्यांचे वय आणि तरुणाईला नेतृत्व मिळावे यासाठी अनेक जेष्ठ व तरुण विधिज्ञानी एकत्र येण्याचा निर्णय घेतला व ऍड अशोक कवडे यांच्या माध्यमातून एक नव्या उमेदीचा परिवर्तन पॅनल निवडणूकिसाठी उभा केला .
यावेळी अनेक जेष्ठांनी एकत्र येऊन वकील मंडळींना परिवर्तनासाठी प्रेरित केले ज्यामध्ये ऍड.अशोक कवडे यांच्या नेतृत्वाखाली आणि जेष्ठ विधिज्ञ ऍड.सुधाकर चिखलीकर, ऍड विष्णुपंत सोळंके, ऍड. किशोर गिरवलकर, ऍड. माधव जाधव जेष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली या पॅनॉल तयार करण्यात आला.मागच्या एक दशकापासून अनेक निवडणुका लढवत ऍड. शरद लोमटे यांनी त्यांचेच सहकारी जेष्ठ विधिज्ञ ऍड. अण्णासाहेब लोमटे, ऍड. किशोर गिरवलकर, ऍड.विष्णुपंत सोळंके, ऍड. सुधाकर चिखलीकर यांचा पराभव केलेला होता. त्यामुळे अनेक निवडणुका लढवल्याचा आणी त्या जिंकण्याचा अनुभव ऍड शरदअण्णा लोमटे यांना होता. त्यामुळे ही निवडणुकसुद्धा ते अगदी सहज जिंकतील असा कयास त्यांच्या सहकार्यांनी काढला होता.
मात्र यावेळी परिवर्तन घडविन्याचा जणू चंगच बांधला असल्याने अंबाजोगाई बार कोन्सिल च्या बहुतांश सदस्यांनी अत्यंत तरुण व नव्या उमेदीच्या ऍड अशोक कवडे व त्यांच्या सर्व सहकार्यांना निवडून आणण्याचा आणि गेल्या 10 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावण्याची भुमिका मतदारांनी घेतल्याचे आजच्या निकालावरून स्पस्ट दिसून आले. याचीच परिणीती म्हणून ऍड. शरद अण्णा लोमटे यांना यावेळी पराभवाचे तोंड पाहवे लागले. ऍड. लोमटे यांचा संपूर्ण पॅनॉल पराभूत झाला. तर वकिल संघ एकता पॅनॉलने दणदणीत व निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. अध्यक्षपदी ऍड. अशोक कवडे, उपाध्यक्षपदी ऍड. शिवाजी केंद्रे, सचिवपदी ऍड. मनजित सुगरे, सहसचिवपदी ऍड.विकास भुरे, ग्रंथपालपदी ऍड. बळीराम पुरी यांना बहुमताने विजयी करण्यात आले. विजयी झाल्यानंतर गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. बड्या बड्या व अनुभवी जेष्ठ विधिज्ञाना जे जमले नाही ते ऍड अशोक कवडे यांनी विविध जेष्ठ मार्गदर्शकांच्या बळावर ऍड शरद लोमटे यांना पराभवाची धूळ चारण्यात यश मिळवले. ऍड अशोक कवडे यांना त्यांच्या विजयाबद्दल राज्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत .