Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईकेंद्र सरकारने खतांच्या किंमती कमी करण्यासाठी 700 रुपयांची सबसिडी वाढवली, निर्णयाचे आ.लक्ष्मण...

केंद्र सरकारने खतांच्या किंमती कमी करण्यासाठी 700 रुपयांची सबसिडी वाढवली, निर्णयाचे आ.लक्ष्मण पवारांकडून स्वागत

केंद्र सरकार व खा.प्रितमताई मुंडे यांचे मानले आभार

गेवराई (रिपोर्टर) रासायनिक खतांच्या भाववाढ निर्णयाबाबाबत शेतकऱ्यांची लोकभावना लक्षात घेऊन एक संसद सदस्य या नात्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्याने याची दखल घेत केंद्र सरकार कडून 700 रुपयांची सबसिडी वाढवून खतांच्या किंमती पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान,केंद्रीय मंत्री व खा.प्रीतमताई यांचे प्रसिध्दी पत्रक काढून जाहीर आभार मानले आहेत.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आधीच कोरोणाचे संकट, सततचे लॉकडाऊन, पडलेले बाजार भाव, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी हातबल झाला आहे.अश्यातच कोरोनामूळे सततचा लॉकडाऊन यामुळे खत निर्मीतीसाठी लागणाऱ्या कच्या मालाच्या वाढलेल्या किंमती यामुळे ऐन खरिपाच्या हंगामातच रासायनिक खतांची झालेल्या भाव वाढीमुळे बळीराजा अडचणीत सापडला होता. त्यामुळे वाढलेल्या किमती कमी करण्याची लोकभावना लक्षात घेता केंद्र सरकारने बळीराजाला दिलासा देण्यासाठी अधिकचा भार उचलून 700 रुपयांनी सबसिडी वाढवली आणि खतांच्या किंमती कमी केल्या यासाठी खा.प्रीतमताई मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा केला असता त्यांच्या मागणीची दखल घेत केंद्र सरकारच्या वतीने 700 रुपयांनी सबसिडी वाढवल्यामुळे खतांच्या किमती पूर्ववत होऊन बळीराजाला दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल आ.लक्ष्मण पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मा. सदानंदजी गौडा, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्यमंत्री मनसुखजी मंडाविया व खा.प्रीतमताई मुंडे यांचे आभार मानले आहेत. तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची लोकभावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन कायम पाठीशी उभे राहत असल्याची भावना त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!