Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीतांची काळजी घेण्यासाठी १२० क्लिनिकल असिस्टंट तर ४०० ऑक्सिजन...

जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीतांची काळजी घेण्यासाठी १२० क्लिनिकल असिस्टंट तर ४०० ऑक्सिजन ऑब्झर्वर


रुग्णांची फरफट थांबणार, नातेवाईकांची काळजी मिटणार

बीड (रिपोर्टर):- जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधीत रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार तात्काळ मिळण्यासाठी जीएनएमच्या सेकंड ईयर, थर्ड इयरच्या तब्बल १२० विद्यार्थिनींना सेवेमध्ये दाखल करून घेण्यात येत असून या विद्यार्थिनी गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांकडे लक्ष देणार आहेत. त्या पाठोपां तब्बल ४०० वार्डबॉय यांना रुग्णालयात दाखल करून घेतले असून ऑक्सिजन ऑबझर्वर कम बेड या पद्धतीने ते काम करणार आहेत. रुग्णांच्या गरजेनुसार डॉक्टरासह अन्य संबंधित स्टाफ अथवा नर्स यांना माहिती देऊन रुग्णांना कुठलीही वैद्यकीय सेवा कमी पडणार नाही याकडे लक्ष देणार आहेत. यामुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवा रुग्णांना मिळण्यास अधिक मदत होणार आहे.


बीड जिल्हा रुग्णालयामध्ये ७०० पेक्षा अधिक कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये काही गंभीर, अतिगंभीर रुग्ण आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण असल्यामुळे स्टाफची कमतरता जाणवत असल्याने जिल्हा रुग्णालयातील उपचारा बाबत उलटसुलट चर्चा होते. रुग्णांजवळ नातेवाईक नसल्याने त्यांच्या छोट्या मोठ्या गरजा पुर्ण करता येत नव्हत्या. अशा वेळी आता बीड जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन ऑबझर्वर कम बेडसाठी तब्बल ४०० वार्डबॉय नियुक्त केले आहेत. हे वार्डबॉय प्रत्येक रुग्णांची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गरज पुर्ण करणार आहे. जिल्हा रुग्णालयातील गंभीर रुग्णांच्या रिक्वायरमेंट त्यांना तात्काळ मिळाव्यात म्हणून या रुग्णांजवळ जीएनएमच्या द्वितीय आणि तृतीय वर्षामध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना थांबवण्यात येणार आहे. तब्बल १२० विद्यार्थिनींना तात्पुरते सेवेत सामावून घेण्यात येत असून या विद्यार्थिनी ज्यांना की वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव आहे त्या गंभीर आणि अतिगंभीर कोविड रुणांजवळ थांबणार आहेत. त्यांना काय लागते काय नाही यासह योग्य वेळी डॉक्टरांना बोलवणे, याचे काम ते करणार आहेत. त्यांच्या या कामामुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवा अधिक प्रमाणात रुग्णांना मिळेल. याबाबत आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुर्यकांत गित्ते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जीएनएमच्या द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थिनी आपण भरती करत आहोत. कोविड वॉर्डातील रुग्णांना जवळ ते थांबतील, आवश्यकतेनुसार डॉक्टरांना बोलावतील, रुग्णांच्या छोट्या मोठ्या रिक्वायरमेंट असतील त्या पुर्ण करतील. यामुळे रुग्णांना जलदगतीने वैैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल.


या कर्मचार्‍यांचे काम काय असणार
रुग्णांची सुश्रुता, वेळेवर मेडिसीन, गंभीर अथवा अति गंभीर रुग्णास आवश्यकतेनुसार डॉक्टरांना पाचारण करणे, रुग्णांच्या नातेवाईकांचा आणि रुग्णाचा संवाद घडवून आणण्यापेक्षा रुग्णांच्या प्रकृतीची माहिती नातेवाईकांना देणे, नातेवाईकांशी सातत्याने काउन्सिलिंग करणे यासह अन्य बारीकसारीक गोष्टींवर ऑक्सिजन ऑब्झर्व्हर कम बेड आणि क्लिनिकल असिस्टंट.

Most Popular

error: Content is protected !!