Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनामोदी म्हणाले, गावांना कोरेानापासून वाचवायचे लसीकरण करा, एकही लस वाया जावू देऊ...

मोदी म्हणाले, गावांना कोरेानापासून वाचवायचे लसीकरण करा, एकही लस वाया जावू देऊ नका


बीडच्या जिल्हाधिकार्‍यांसह महाराष्ट्रातल्या १७ जिल्हाधिकार्‍यांसोबत घेतली व्हिसीद्वारे बैठक
बीड (रिपोर्टर):- आपल्या गावांना कोरोनापासून वाचवायचे आहे, त्यासाठी गाव पातळीवर कोरानाच्या चाचण्या वाढवा, लसीकरण वाढवा, गावातील लोकांची मदत घेत गावामध्ये कोरोना येणार नाही यासाठी दक्षता घ्या, आपण सर्व कोरोना काळात काम चांगले करत आहात. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपआपल्या जिल्ह्यामध्ये आजही पुर्ण संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे सांगत लवकरच आपण कोरोनावर विजय मिळवू, असा विश्‍वास व्यक्त केला.
ते देशातील ५४ आणि महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत होते. महाराष्ट्रातील बीड, नगर, बुलढाणा, चंद्रपूर, सातारा, नाशिक, परभणी, सांगली, जालना, वर्धा, सोलापूर, पालघर, अमरावती, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, नागपूर येथील जिल्हाधिकार्‍यांसोबत संवाद साधताना नगर येथील जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नगर जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची ऑक्सिजनसह अन्य बाबींची माहिती पंतप्रधानांना दिली. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, सीएस डॉ. सुर्यकांत गित्ते, सूचना आणि प्रसारण अधिकारी महेश गोले हे उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान म्हणाले की, यावेळी मोदी म्हणाले, करोना महमारीसारख्या संकटासमोर सर्वात जास्त महत्व हे आपली संवेदशीलता व धैर्यालाच असते. आपल्याला जनसमान्यांपर्यंत जाऊन अधिक काम करत रहावं लागणार आहे. नवनवीन आव्हानात आपल्याला नवनवीन पद्धती व उपायांची आवश्यकता असते, यामुळे हे आवश्यक होते की आपण आपले स्थानिक अनुभव एकमेकांना सांगावे. एक देश म्हणून आपण एकजुटीने काम करायला हवं. आपल्याला गावांगावात हा संदेश पोहचवायचा आहे, की आपल्याला आपलं गाव करोनामुक्त ठेवायचं आहे आणि प्रदीर्घ काळा जागरूकतेने प्रयत्न करायचे आहेत. तसेच, मागील काही काळात देशात ऍक्टीव्ह केस कमी होत असल्याचे दिसून येत आहे, पण तुम्ही या दीड वर्षात हा अनुभव घेतला असेल की, जोपर्यंत हा संसर्ग उणे पातळीवर देखील अस्तित्वात आहे, तोपर्यंत आव्हान कायम आहे. अनेक वेळा जेव्हा केसेस कमी होऊ लागतात, तेव्हा लोकांना वाटतं की आता काळजीचं कारण नाही, करोना आता गेला आहे. मात्र अनुभव वेगळाच आहे. तपासणी, सुरक्षित अंतर आदींबाबत लोकांमध्ये गांभीर्य कमी होऊ नये, यासाठी सरकारी तंत्र, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी या सगळ्यांमध्ये एका सामूहिक जबाबदारीचा भाव आपल्याला पक्का करायला हवा. यामुळे प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढते. कोविड प्रतिबंधात्मक वर्तवणुक जसं मास्कचा वापर, हात धुणे आदींमध्ये जेव्हा काही उणीव राहत नाही व सर्व करोना निर्देशांचे नागरिकांकडून पालन केले जाते ते करोना विरोधातील लढाईसाठी अत्यंत महत्वाचे ठरते. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवल्याने, जिल्ह्यातील सर्व प्रमुख विभागांमध्ये योग्य समन्वय राहतो व प्रभावी परिणाम स्वाभाविकपणे दिसू लागतात. असं देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!