Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजच्या रिपोर्टमध्ये दिलासा; 720 पॉझिटिव्ह बीड तालुक्यात फक्त 48 आढळले

आजच्या रिपोर्टमध्ये दिलासा; 720 पॉझिटिव्ह बीड तालुक्यात फक्त 48 आढळले

आजच्या रिपोर्टमध्ये दिलासा; 720 पॉझिटिव्ह बीड तालुक्यात फक्त 48 आढळले

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाभरात कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. असे असतांनाही पॉझिटिव्हचा आकडा हजाराच्या पुढे रोज निघत आहे. मात्र आज आलेल्या रिपोर्टमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला. 720 पॉझिटिव्ह रूग्ण आढळनू आले. 2995 रूग्ण निगेटीव्ह आले, 3715 स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले होते. आज आलेल्या रिपोर्टमध्ये अंबाजोगाई पॉझिटिव्हची संख्या 61, आष्टी 100, बीड 48, धारूर 70, गेवराई 66, केज 102, माजलगाव 71, परळी 35, पाटोदा 71, शिरूर 76 आणि वडवणीमध्ये 20 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. बीड शहरासह ग्रामीण भागात शेकड्याने रूग्ण निघत होते. मात्र आजच्या अहवालात फक्त 48 रूग्ण आढळून आल्याने समाधान व्यक्त केले जावू लागले आहे.

Most Popular

error: Content is protected !!