Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनाआरोग्य विभागाने जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचार्‍यांना सोडले वार्‍यावर

आरोग्य विभागाने जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचार्‍यांना सोडले वार्‍यावर


तुटपुंज्या मानधनावर कोरोना विभागात देतात सेवा
गेवराई (रिपोर्टर) : आरोग्य विभागातले चारशे कंत्राटी कर्मचारी वार्‍यावर असून, तुटपुंज्या मानधनावर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कोरोना विभागात सेवा देत आहेत. कसलीही हमी नाही. ना, सरकारी विमा संरक्षण कवच आहे. त्यामुळे, कुठे आहे समान वेतन, समान काम ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आरोग्य विभागात विविध पदांवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍याकडून कायम सेवेतील अधिकारी व कर्मचार्‍या एवढेच काम करून घेतले जात असून, पगाराची तुटपुंजी रक्कम हातावर ठेवली जात आहे.

त्यामुळे, समान वेतन समान काम या धोरणाला हरताळ फासला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, जिल्ह्यातील चारशे कंत्राटी कर्मचार्‍यां कधी न्याय मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोरोना महामारीच्या कार्यात जवळपास चारशे कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून, कोणतेही विमा संरक्षण कवच डोक्यावर नसताना, हे कर्मचारी इमानेइतबारे सेवा देत आहेत. दुसरीकडे कायम सेवेत असलेल्या गल्लेलठ्ठ पगारी कर्मचार्‍यांना पन्नास लाखाचे विमा संरक्षण कवच आहे. आरोग्य कर्मचार्‍यांवर अन्याय आणि भेद करणारा हा विषय नेमका ऐरणीवर आला असून, कंत्राटी कर्मचारी सरकारी धोरणावर नाराजी व्यक्त करत आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, क्यू.बी.एस.के, बी.सी.एच.सी, च्या आरोग्य विभागात चारशे कंत्राटी कर्मचारी सेवेत आहेत. त्यांना मानधन तत्वावर पगार दिला जातो. या कर्मचार्‍यांना कोरोना बाधीत रुग्णांच्या सेवेत ठेवले आहे. मात्र, सरकारकडून त्यांना कोणतीही हमी नाही. कसलेही विमा संरक्षण नाही. या सर्व कर्मचार्‍यांकडून सेवा करून घेतली जाते. मात्र , त्यांची काळजी घेतली जात नाही. हे कर्मचारी दिवसरात्र कोरोना महामारीच्या कठीण काळात काम करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!