Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनावाहन धारकांची धरपकड, चौकशी सुरुच

वाहन धारकांची धरपकड, चौकशी सुरुच


दुपारपर्यंत १२२ वाहन धारकांवर केली कारवाई; पकडलेल्या अनेक गाड्यांवर जुनाही दंड निघाला
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णांचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावलेले आहेत. पोलीस प्रशासनाने जागोजागी वाहन धारकांची चौकशी सुरू केली. जी वाहन धारक दोषी आढळून येईल अशा वाहन धारकांकडून दंड वसुल केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याच्या चोही बाजुने पोलीस वाहनाची कसुन चौकशी करतात. दुपारपर्यंत १२२ वाहन धारकांवर कारवाई करून या वाहन धारकाकडून दंड वसुल करण्यात आला. ज्या वाहन धारकांना दंड आकारण्यात आला त्यातील अनेक वाहनांवर जुनाही दंड असल्याचे समोर आले.
बीड जिल्ह्यामध्ये २५ मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. रूग्णालय, मेडिकल वगळता इतर सर्व व्यवसाय सध्या बंद आहेत. बीड शहरामध्ये सडकफिर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आढळून येवू लागल्याने या सडकफिर्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी जागोजागी पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. हे कर्मचारी वाहन धारकांची चौकशी करून दोषी वाहन धारकांवर कारवाई करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याच्या चोही बाजुने पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या ठिकाणी येणार्‍या-जाणार्‍या वाहनाची चौकशी केली जाते. जे वाहन धारक दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. दुपारपर्यंत १२२ वाहन धारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला. बहुतांश वाहन धारकांवर जुना दंड असल्याचे समोर आलेले आहे.

Most Popular

error: Content is protected !!