Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनापुढार्‍यांनो मतं मागणीसाठी येता आता मदतीसाठी पुढे या, आमदार, खासदारांसह जि.प.,पं.स....

पुढार्‍यांनो मतं मागणीसाठी येता आता मदतीसाठी पुढे या, आमदार, खासदारांसह जि.प.,पं.स. सदस्यांनी ग्रामीण भागाचे दौरे करावे


बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फैलावत असल्याने दररोज खेड्यात शेकडो नवीन रुग्ण निघू लागले. अशा संकटाच्या काळात जि.प., पं.स. सदस्यांसह ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गावकर्‍यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि त्यांची मदत करण्यासाठी पुढे यायला हवे. निवडणुका आल्या की, हे पुढारी मतं मागण्यांसाठी दारोदारी जात असतात. मात्र संकटाच्या काळात गावकर्‍यांच्या मदतीसाठी पुढारी तितके पुढे येत नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि लोकांना धीर देण्यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे.


कोरोनाची दुसरी लाट खतरनाक ठरू लागलीय. बीड जिल्ह्यात दररोज हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात रुग्णांची संख्या मोठी दिसून येऊ लागली आहे. मरणार्‍यांची संख्याही वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या संदर्भात जनजागृती अणि गावकर्‍यांना मदत करण्यासाठी गावपुढार्‍यांसह जि.प., पं.स. सदस्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे निवडणुकीत पुढारी गावे पिंजून काढतात, मतदारांच्या दारोदारी जावून मते मागतात त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनी आता गावकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे यायला हवे. कारण कोरोनाच्या पेशन्टला मदत करण्यासाठी शक्यतो लोकप्रतिनिधी पुढे येत नसल्याचे चित्र ग्रामीण भागामध्ये दिसून येऊ लागले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आमदार खासदारही ग्रामीण भागात दौरे करत असतात. मात्र आज संकटाच्या काळात त्यांचे दौरे होताना दिसून येत नाही. काही बोटावर मोजण्याइतकेच आमदार काम करतात इतरांचे मात्र तितके योगदान दिसून येत नसल्याने सर्वच पुढार्‍यानंी लोकांना मदत करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे तेव्हाच कोरोनाचा संसर्ग दुर होऊ शकतो हे मात्र नक्की.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!