Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनाकेज शहरात पुन्हा अँटीजेन तपासणी मोहीम सुरू दुपारपर्यंत ७५ जणांची तपासणी; १२...

केज शहरात पुन्हा अँटीजेन तपासणी मोहीम सुरू दुपारपर्यंत ७५ जणांची तपासणी; १२ पॉझिटिव्ह आढळले


केज (रिपोर्टर):- केज शहरामध्ये रुग्णांची संख्या कमी-जास्त प्रमाणात होत असल्याने सडकफिर्‍यांची ऍटीजेन तपासणी करण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. आज दुपारपर्यंत ७५ जणांची तपासणी केली असता त्यात १२ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मध्यंतरी प्रत्येक तालुक्यात अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या होत्या मात्र या टेस्ट सध्या बंद आहेत. केज शहरात आजपासून पुन्हा अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय आरोग्य प्रशासनाने घेतला. शहरात सडकफिर्‍यांची संख्या वाढत असल्याने या सडकफिर्‍यांची चौकशी करून त्यांची चाचणी केली जात आहे. आज दुपारपर्यंत ७५ जणांची चाचणी केली असून यामध्ये १२ जण पॉझिटिव्ह निघाले. सदरील ही कारवाई छत्रपती शिवाजी महाराज चौकात केली जात आहे. या वेळी पोलीस नाईक भोले यांच्यासह इतर कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!