Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमबीड जिल्ह्यात कोरोना हळूहळू कमी होऊ लागला आज बीडमध्ये १९ सडकफिरे पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात कोरोना हळूहळू कमी होऊ लागला आज बीडमध्ये १९ सडकफिरे पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर): गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. काल बीड जिल्ह्याला यामध्ये चांगलाच दिलासा मिळाला. आज पहिल्या सत्रात म्हणजे सकाळी सात ते ११ पर्यंत २२८ सडकफिर्‍यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये १९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. तर १ हजार ५२० वर गेलेला आकडा तब्बल ७२० वर आल्याने बीडकरांना यातून मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा समुहसंसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी कडक लॉकडाऊन घोषीत केल्याने बीड जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी बीड जिल्ह्यात १५०० च्या पुढे रुग्णसंख्या होती ती हळूहळू ७२० वर आली आहे. अँटीजेन टेस्टमध्येही सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर बाधीत रुग्ण आढळून येत होते. आता तोही आकडा सातत्याने कमी होऊ लागला आहे. आज सकाळी बीड शहरात आठ ठिकाणी २२८ सडकफिर्‍यांच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये १९ जण बाधीत आढळून आले आहेत.


आज १८२ वाहनधारकांवर कारवाई
बीड पोलीसांकडून ठिकठिकाणी वाहन धारकांची चौकशी केली जात आहे. दोषी वाहनधारकांना दंड आकारला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर चारही बाजुने बॅरिकेटस् लावून त्याठिकाणी चेकिंग केली जात आहे. आज दुपारपर्यंत १८२ वाहनधारकांना दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, एपीआय काळे, एपीआय पाटील, नितीन काकडे, तुषार गायकवाड सह इतर कर्मचार्‍यांनी या कारवाया केल्या.


अशी लागली उतरती
जिल्ह्यात दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. तब्बल दीड हजाराच्या पुढे रोज रुग्ण आढळून येत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येला उतरती लागली असून १ मे रोजी १५२० रुग्ण आढळून आल्यानंतर ६ मे रोजी १४३९ रुग्ण आढळून आले. त्यानंतर बीडमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली. त्यानंतर ८ मे रोजी १३१४, १० मे रोजी १२७३, १२ मे रोजी १२५८, १४ मे रोजी १०१५, १६ मे रोजी ११५०, १८ मे रोजी १११८, २० मे रोजी ९७५, २२ मे रोजी ७२० अशाप्रकारे बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येला उतरती लागली.

Most Popular

error: Content is protected !!