Thursday, December 3, 2020
No menu items!
Home कोरोना ३५० संशयितांमध्ये आढळले ५२ पॉझिटिव्ह

३५० संशयितांमध्ये आढळले ५२ पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर)- सणासुदीच्या काळातही आरोग्य विभागाच्या वतीने संशयितांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. काल दिवसभरात ३५० संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज दुपारी साडेबारा वाजता आला असून त्यामध्ये ५२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कमी संशयितांमध्येही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आढळून येत आहे. काल दिवसभरात घेतलेल्या ३५० संशयितांच्या स्वॅबच्या अहवालात २९८ जण निगेटिव्ह आले असून ५२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बीड तालुक्यातून असून ते १६ जण आहेत. अंबाजोगाई ५, आष्टी ५, गेवराई ५, धारूर १, पाटोदा १, शिरूर १, माजलगाव ११ तर परळीत ६ जण बाधीत आढळून आले आहेत.

Most Popular

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...

माजी मंत्री पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

बीड (रिपोर्टर)- मला सर्दी खोकला आणि ताप असल्याने मी जबाबदारी स्वीकारून स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी...

गावागावात नरभक्षी सन्नाटा अफवामुळे संभ्रम

किन्ही गावातील काही रहिवाशांचे पलायन, लहान मुलांनी स्वत:ला कोंडून घेतले; सायंकाळी पाच नंतर घराची दारे बंद करून घेतात ग्रामस्थसंपुर्ण रात्र जीव मुठीत...

पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवडे पाटील यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार

  पिंपळनेर - रिपोर्टर . बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवाडे पाटील यांचे...