Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाकामात कुचराई; डॉक्टर, नर्ससह सात जण कार्यमुक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा दणका

कामात कुचराई; डॉक्टर, नर्ससह सात जण कार्यमुक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा दणका


आष्टी (रिपोर्टर) : आष्टी येथील कोवीड सेंटरमधील रूग्णांच्या सेवेत कुचराई करणार्‍या १ डॉक्टरसह ७ जणांना शनिवारी पहाटे अचानक डीएचओ डॉ. आर.बी.पवार यांनी भेट देऊन ७ जणांना कार्यमुक्त केल्याचे कारवाई केली आहे.यामुळे कामचुकारांचे धाबे दणाणले आहेत.
आष्टी येथील कोवीड सेंटमध्ये उपचार घेत असलेले रूग्ण बाहेर फिरताना डॉ.पवार यांना भेटी दरम्यान आढळून आले , डॉक्टर, परचारिका उपचाराकडे दुर्लक्ष करतात, वॉर्डबॉय स्वच्छता करत नाहीत, अशा तक्रारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांनी याची गंभीर दखल घेत आष्टी गाठत कोवीड सेंटरची तपासणी केली. यात त्यांना भरपूर त्रूटी दिसल्या. तसेच कामात हलगर्जी झाल्याचेही दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता येथे कर्तव्यावर असणार्‍या डॉ.माधूरी पाचरणे, या डॉक्टरसह अश्विनी पानतावणे, रूपाली काळे आणि वार्डबॉय निखिल वाघुले,आकाश राऊत,सुमित धोंडे,आणि भारत राऊत यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Most Popular

error: Content is protected !!