Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी डॉक्टर सेवा देत नाहीत; उपसंचालक डॉ. मालेंची कबुली

जिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी डॉक्टर सेवा देत नाहीत; उपसंचालक डॉ. मालेंची कबुली


जिल्हा रुग्णालयात अनेक त्रुटी,दोषींना कारणे दाखवा नोटीस
बीड (रिपोर्टर):- जिल्हा रुग्णालय एक ना अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. कायमस्वरुपी डॉक्टर मंडळी या दवाखान्यामध्ये रुग्णांना सेवा देत नाहीत. कायमस्वरुपी डॉक्टर वार्डात येऊन केस पेपरवर रुग्णांना औषधी लिहून देतात. स्वत: रुग्णाकडे जावून तपासणी केली जात नाही. दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. अनेक रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या समित्या कार्यरत आहेत. त्या काम करत नाहीत. म्हणून या बाबत सर्वांना कारणे दाखवा नोटीसा बजावत कामात सुधारणा करण्याच्या सूचना उपसंचालक माले यांनी दिल्या.


गेल्या दोन दिवसांपासून लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक माले हे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या प्रत्येक वार्डाचा राऊंड घेतला. या राऊंडमध्ये त्यांना कायमस्वरुपी डॉक्टर दिसून आला नाही. या वार्डामध्ये कंत्राटी डॉक्टर सेवा देतात. कायमस्वरुपी डॉक्टर स्वत:च्या दवाखान्यामध्ये मश्गुल असतात. या दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. डेथ ऑडीट झालेले नाही, कोविड रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ज्या समित्या नियुक्त केल्या त्यातील कोणती समिती काम करत नाही, बाहेरून औषधे आणण्याची गरज नसताना येथील डॉक्टर रुग्णांना आणि रुग्णांच्या नाते-वाईकांना बाहरून औषध आणण्यासाठी विनाकारण सांगतात. त्यामुळे गेल्या दोन दिवसात मी दवाखान्याची सगळी परिस्थिती लक्षात घेतली असून त्यामुळे दोषींना कारणे दाखवा नोटीसा बजावणार आहे. कोविड रुग्णांसाठी मानसोपचार तज्ञांी मदत घेऊन त्यांचे समोपदेशन आणि मानसिक आधार देण्याची गरज असल्याचे माले यांनी सांगितले. याबाबत माले यांनी सरकारी दवाखान्याच्या कामकाजाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली.
सीएसच्या चौकशीसाठी समिती
जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख म्हणून डॉ. सुर्यकांत गित्ते कार्यरत असताना ते दीप हॉस्पिटल नावाचे खासगी रुग्णालय चालवतात कसे? आणि काल त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये बील भरण्याच्या अनुषंगाने कोरोना रुग्णाने आत्महत्या केली आहे. याबाबत मी विभागातील दुसर्‍या शल्यचिकित्सकामार्फत चौकशी नियुक्त करून गित्ते यांची चौकशी केली जाईल. त्यासोबतच गित्ते यांच्यावर कारवाई करण्यासाठी माझा स्वत:चाही स्वयंस्पष्ट अहवाल राज्य शासनाला पाठवून देईल.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!