Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनावेळ पडल्यास घरावर तुळशीपत्र ठेवून लोकांचे जीव वाचवू -धनंजय मुंडे

वेळ पडल्यास घरावर तुळशीपत्र ठेवून लोकांचे जीव वाचवू -धनंजय मुंडे


कुठल्याही भयंकर परिस्थितीला सामोरे जाण्यास बीड जिल्हा सक्षम-धनंजय मुंडे
आष्टी (रिपोर्टर):- एखाद्या वेळेस आमच्या सारख्यांच्या घरावर जरी तुळशीपत्र ठेवले तरी चालेल पण सर्वसामान्य जनतेचे जीव वाचले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्व राजकारण्यांनी आपले राजकीय जोडे बाजुला ठेवून कोरोनाच्या लढाईत एकत्रित येण्याची गरज आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लायेत रुग्णांना ऑक्सीजन बेड, यंत्रण सामग्री कमी न पडू देण्याची जबाबदारी आम्ही पार पाडली आहे आणि पुढेही रुग्णांना कुठलीही वैद्यकीय सेवा कमी पडणार नाही असे म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना रोखण्यात बीड जिल्हा प्रशासनाला यश आले असून कितीही मोठी आपत्ती आली तरी इथे आरोग्य सुविधा कमी पडू देणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तर आ. रोहीत पवार यांनी येथील कोविड सेंटरला व आष्टी मतदारसंघाच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहील, असे उपस्थितांना आश्‍वासन दिले.
ते आष्टी येथील ऍड. बी.बी. हंबर्डे महाविद्यालयातील आधार कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आ. रोहीत पवार, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, आ. यशवंत माने, मा. आ. साहेबराव दरेकर,माजी आ. अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवा प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब, भाऊसाहेब लटपटे, शिवाजी राऊत, जि.प. सदस्य सतीश शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्यावतीने आष्टी शहरातील बी.डी.हांबर्डे महाविद्यालयात पन्नास बेडचे आधार कोव्हीड सेंटरचे आज शनिवार दि.२२ रोजी सकाळी सव्वा दहा वाजता बीडचे पालकमंञी ना.धनजंय मुंडे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ना.मुंडे बोलत होते.लाटे लाटेत सुध्दा फरक होता.पहिल्या लाटेत एक मास्क लागत होता आणि दुस-या लाटेत दोन मास्क लावावे लागत आहे.दुस-या लाटेत रूग्णांना ऑक्सीजीनची गरज भासायला लागली,तसेच मत्यूचे प्रमाण वाढत आहे.पण येथे आज माझ्या हाताने या आधार कोव्हीड सेंटरचे उद्याटन माझ्या हाताने झाले याचा मला अभिमान आहे.या कोव्हिड सेंटरला वैद्यकीय सेवा देणा-या डॉक्टरांच्या हातून चांगली सुविधा मिळवून रूग्ण लवकरात लवकर बरा होवो हिच प्रभूवैद्यनाथ चरणी प्रार्थना असेही ते म्हणाले. आ. रोहित पवार,गेवराईचे माजी आ.अमरसिंह पंडीत,आ.संदिप क्षिरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजीरंग बप्पा सोनवणे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेशध्यक्ष महेबुब शेख, माजी आ.साहेबराव दरेकर, रामकष्ण बांगर,यशवंत माने, डॉ.विलास सोनवणे, सतिष शिंदे, किशोर हंबर्डे, भाऊसाहेब लटपटे, यांच्यासह आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरूवातीला प्रस्ताविक करताना आ.बाळासाहेब आजबे म्हणाले,हे कोव्हीड सेंटर सुरू करण्यास वास्तविक पाहता उशीर झाला आहे.पण यातील वास्तव आपल्याला माहित आहे.आष्टीमध्ये जवळपास पाच कोव्हीड सेंटर सुरू आहेत.तसेच आष्टी ग्रामिण रूग्णालयात ना.धनजंय मुंडे यांच्या मदतीने जवळपास दोन ते अडीच कोटी खर्च केले आहेत.देव न करो तिसरी लाट जर आली तर आपल्याला लहान मुलांची पण उपचाराची तयारी आपल्याला करावी लागणार आहेत.जिल्हा शल्य चिकीत्सकांचे काम चांगले असल्याचेही त्यांनी सांगीतले. जामखेड आमदार रोहित पवार म्हाणाले, सध्याची भयान परिस्थिती असून, काही गोष्टी आपल्या हातात असतात नाही गोष्टी आपल्या हातात नसतात आपण नेहमी प्रयत्न करायचे असतात असेच नेहमी आ.आजबे काकाचे असतात माझ्याकडून जी काही मदत लागेल ती मी देण्याचा प्रयत्न करणार असून,चांगल्या कामाचे राजकारण न करता सर्वांनी मदत करण्याचे अवाहनही त्यांनी केले.
एक महिन्यात बीड जिल्ह्यात बाहेरून ऑक्सीजन आणण्याची गरज नाही
बीड जिल्ह्यात जरी रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी जिल्ह्यात ऑक्सीजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.परंतु पुढील एक महिन्यानंतर जिल्ह्याला ऑक्सीजन बाहेर जिल्ह्यातून आणण्याची गरज पडणार नाही.कारण बीड जिल्ह्यात पुढील एक महिन्यात जिल्ह्यातील सहाही ऑक्सीजन बेड कार्यन्वीत होणार असल्याचेही ना.धनजंय मुंडे यांनी सांगितले.
रुग्ण दगावला तर फी घेणार नाही
सुरू केलेले आधार कोव्हीड सेंटर आम्ही सेवाभाव या उद्देशाने सुरू केले आहे.आणि आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणेच बील घेणार आहोत.दुर्देवाने जर उपचार घेत असलेल्या रूग्ण दगावला तर त्याचे कसलेही बील आम्ही घेणार नसल्याचे आमदार आजबे यांनी जाहिर केले आहे.
यांचा केला सन्मान
कोरोनाकाळात आपला जीव धोक्यात घालून सतत ग्रामिण रूग्णालयात रुग्णांची सेवा करणारे अशोक पोकळे, नाजीम शेख, विजय बांगर, संदिप सुंबरे यांचा सन्मान पालकमंञी धनजंय मुंडे यांच्याहस्ते प्रशस्तीपञ देऊन सन्मानीत करण्यात आले.

Most Popular

error: Content is protected !!