Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमशिरूरमध्ये सराफाचा प्रीप्लॅन मर्डर

शिरूरमध्ये सराफाचा प्रीप्लॅन मर्डर


सोने खरेदीची ऑफर देऊन सलूनमध्ये नेले, आधी गळा दाबला, नंतर तोंडात कातर खुपसली; मृतदेह मोटारसायकलवर शेगाव तालुक्यात नेला, भातकुडगावात पुरला
शिरूर (रिपोर्टर):- कोरोनाने जिल्हावासिय एकीकडे मेटाकुटीला आलेला असतानाच दुसरीकडे शिरूर शहरात सोनं लुटण्यासाठी प्रिप्लॅन मर्डर उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. माझ्या पत्नीला दागिने घ्यायचे आहेत, असे सांगत मारेकर्‍यांनी सराफास ऑर्डर देऊन सोन्यासह सदरील सराफास सलूनच्या दुकानात नेत त्याचा गळा दाबून व नंतर तोंडात कात्री खुपसून निर्घृण खून करत दिवसाढवळ्या मृतदेह शिरूर येथून थेट शेवगावपर्यंत मोटारसायकलवर नेत त्याठिकाणी पुरून टाकल्याची घटना आज उघडकीस आली आहे. मृत्यूमुखी पडणारा सराफ अवघ्या 25 वर्षाचा असून या घटनेतील मारेकरीही पंचवीशीतले आहेत. या प्रकरणी दोघा जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. सदरच्या हत्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

aropi
aropi


शिरूर येथील प्रिप्लॅन मर्डरची अधिक माहिती अशी, सराफ विशाल सुभाष कुल्थे (रा. शिरूर कासार) याला तेथीलच ज्ञानेश्वर ऊर्फ भैय्या शिवाजी गायकवाड (रा. हातकुडगाव ता. शेगाव जि. अहमदनगर ह.मु. शिरूर) याने माझे लग्न झाले आहे, माझ्या पत्नीला दागिने घ्यायचे आहेत, असे म्हणून सराफ विशाल यांना दागिने बनविण्याची ऑर्डर दिली. त्यासाठी त्यांनी त्याला 5 हजार रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून दिले. त्यानंतर विशालने बीड गाठत चार ते साडेचार तोळ्याचे ऑर्डरप्रमाणे दागिने बनवून शिरूरकडे जात असताना हिवरसिंगा येथे त्याचा अपघात झाला. तो अपघातात जखमी झाल्यानंतर नागरिकांनी त्याला दवाखान्यात नेऊन त्याच्या घरी सोडले. घरी जाताच भैय्या गायकवाडचा त्याला फोन आला आणि तू बनवून आणलेल्या दागिन्यांसह तुझ्याकडे सोन्या-चांदीचे जे दागिने आहेत ते घेऊन ये, माझ्या घरच्यांना जे पसंत पडतील ते घेतील. असे म्हणून त्याला दागिन्यांसह बोलावून घेतले. त्यानुसार दुचाकीवर घेऊन शिरूर येथील राक्षसभुवन चौकात असलेल्या सलूनच्या दुकानात नेले. त्यापुर्वीच तेथे धिरज अनिल मांडकर (वय 21, रा. पाथर्डी) व संतोष लोमटे (वय 21, रा. भातकुडगाव, ता. शेगाव जि. नगर) हे दबा धरून बसलेले होते. सराफा आणि भैय्या गायकवाड दुकानात येताच दुकानाचे शटर बंद करण्यात आले. त्यानंतर त्याचा गळा दाबून त्याला बेशुद्ध केले आणि दुकानातली कातर त्याच्या तोंडात मारून खून करण्यात आला. खून केल्यानंतर भैय्या गायकवाड याने त्याचे रक्ताने भरलेले शर्ट बदलून दुकाना बाहेर येऊन मयताच्या भावाकडून दोन बिस्लेरीच्या बाटल्या घेतल्या आणि त्याच दिवशी भैय्या गायकवाड आणि त्याचा मित्र याने एका दुचाकीवरून मयताची बॉडी गोदडीत गुंडाळून रुग्णासारखे घेऊन थेट नगर जिल्ह्यातील भैय्या गायकवाड याचे भातकुडगाव गाठले. तेथे गेल्यानंतर त्यांनी घरून खोरे घेऊन भैय्या गायकवाड यांच्या शेतातच मृतदेह पुरला. ही घटना 20 मे रोजी घडली. त्यानंतर सराफा विशाल कुल्थे बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी शिरूर ठाण्यात दिली. त्यावेळी नातेवाईकानीं विशाल हा भैय्या गायकवाडसोबत गाडीवर बसून गेल्याचे पोलीसांना सांगितले. त्यानुसार शिरूर पोलीसांनी आणि स्थानिक पोलीसांनी तपास सुरू केला असता रात्री आरोपी धिरज मांडकर आणि संतोष लोमटे यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यांनी पोलीसांना घटनेची माहिती देत मृतदेह भातकुडगावात पुरल्याचे सांगितले. आज सकाळी तेथील तहसीलदार आणि पंचासमक्ष मृतदेह बाहेर काढण्यात आले. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, पोलीस उपअधीीक सुनिल जायभाये, विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत, शिरूर पोलीस ठाण्याचे पीआय पवार यांनी केली. त्यांना पोलीस नाईक सतीश कातखडे महिला पोलीस नाईक संगीता क्षीरसागर, पो.शिपाई अलिम शेख, मुकुंद सुसकर, पो.ना. आहेर, पो.ना. साळुंके, सुदाम पोकळे यांच्यासह आदींचे सहकार्य मिळाले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!