Monday, June 14, 2021
No menu items!
Homeआरोग्य & फिटनेसमाजलगांवमध्ये आढळला पहिला ओरल म्युकरमायकोसिसचा रुग्ण

माजलगांवमध्ये आढळला पहिला ओरल म्युकरमायकोसिसचा रुग्ण

– डॉ. सचिन देशमुख यांनी केले निदान
— योग्य काळजी घेतल्यास आजारापासुन संरक्षण

दिनकर शिंदे । माजलगाव
कोरोना आजाराने आगोदरच समस्त मानव जात ही अडचणीत सापडलेली आहे. त्यातच म्युकरमायकोसिस या काळया बुरशीच्या आजाराने डोकं वर काढत अनेकांचे प्राण घेतलेले आहेत त्यात आता ओरल म्युकरमायकोसीस या आजाराने देखील एन्ट्री घेतल्याचे येथील स्मित हॉस्पिटलमध्ये आढळुन आलेल्या एका रुग्णामुळे दिसुन आले असुन डॉ. सचिन देशमुख यांनी या आजाराने ग्रस्त एका रुग्णाचे निदान केले तसेच योग्य काळजी घेतल्यास या आजारापासुन सुटका मिळवता येते असे देखील डॉ. देशमुख यांनी सांगीतले आहे.
नजिकच्या काळात म्युकरमायकोसीस नावाच्या बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. माजलगाव तालुक्यात ओरल म्युकरमायकोसीस चे लक्षण असलेले रूग्ण प्रामुख्याने दिसून येत आहेत. आत्तापर्यंत दुर्मिळ असलेल्या या बुरशीजन्य आजाराने कोरोनाग्रस्त रूग्णांना आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे.ओरल म्युकरमायकोसीस आजाराचा प्रथम रुग्ण माजलगाव येथे शनिवारी आढळून आला.माजलगावातील स्मित दातांचा दवाखान्यात डॉ सचिन देशमुख यांनी या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाचे निदान केले.सदर रूग्ण हा दातांवर ट्रिटमेंट करायला आला असतांना त्यामध्ये हिरड्यातून पु येणे, पक्के दात अचानकपणे हलण्यास सुरूवात होणे,तोंडात पांढरे व काळे चट्टे तयार होणे असे लक्षण दिसण्यास सुरुवात झाली. हळूहळू हि लक्षणं वाढल्यामुळे सदरील रूग्णाची सि टि स्कॅन टेस्ट केली असताना ओरल फंगल इन्फेक्शन झाल्याचे निष्पन्न झाले.या रूग्णाची तब्येत व्यवस्थित असून पुढिल उपचारासाठी स्वाराती रूग्णालय अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहे. अशा प्रकारचे इन्फेक्शन होण्याचे प्रमाण कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये वाढत चालल्याचे चित्र दिसुन येते आहे.त्यामुळे कोरोनाग्रस्त व कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ. सचिन देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
— काय आहेत ओरल म्युकर मायकोसिसची लक्षणे
हिरड्यातून पु व रक्त येणे, चेहरा बधीर वाटणे, चांगले मजबुत दात अचानकपणे हलण्यास सुरूवात होणे, तोंडात पांढरे व काळे चट्टे तयार होणे, नाकातून पाणी येणे, दात खुप तीव्रतेने दुखायला लागणे अशी लक्षणं या आजारामध्ये आढळुन येतात.
— ओरल म्युकर मायकोसिस टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी
  मुखसंसर्ग टाळण्यासाठी मौखिक आरोग्य राखावे, स्वच्छता ठेवावी, आरोग्य दायी आहार घ्यावा ,विटामीन सी युक्त फळं खावीत, प्रोटिन्स साठी कडधान्य व दुध अंडी घ्यावीत. विटामीन डी साठी दिवसातून थोडावेळ स्वच्छ सुर्यप्रकाशात जावे.त्याच प्रमाणे वैयक्तिक स्वच्छता ठेवावी, कपडे व मास्क रोज धुवून व वाळवून मगच घालावेत. एवढे केले तरी आपण ओरल म्युकरमायकोसीस या आजारावर मात करून निरोगी आयुष्य व्यतीत करू शकतो.

Most Popular

error: Content is protected !!