Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रसंभाजीराजेंनी फुंकले रणशिंग; मराठा आरक्षणासाठी राज्याचा दौरा करणार

संभाजीराजेंनी फुंकले रणशिंग; मराठा आरक्षणासाठी राज्याचा दौरा करणार


कोल्हापूर (रिपोर्टर):- ऑनलाईन : कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढ्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रणशिंग फुंकले आहे. राज्यातील मराठा समाजाच्या नेमक्या अपेक्षा समजून घेण्यासाठी मुंबई आणि मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे.
   संभाजीराजे यांनी शाहु महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतल्यानंतर आरक्षणावरील भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, बहुजन समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मराठा समाजाच्या नेमक्या अपेक्षा समजून घेण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे.
   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी फोन केल्यांचे संभाजीराजे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना 27 मे किंवा 28 मे रोजी सकाळी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच इतर मोठ्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाला नेत्यांनी वेठीस धरू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय नेत्यांनी मार्ग काढावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. संभाजीराजे यांनी कोरोना संकटात जीव महत्त्वाचा असल्याने मराठा समाजाने संयम बाळगावा असे आवाहन केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!