Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमकामखेड्यातील पवार तांड्यावर दोन गटात तुंबळ मारामारी काठ्या, कुर्‍हाडीसह कोयत्याने हल्ले, पाच...

कामखेड्यातील पवार तांड्यावर दोन गटात तुंबळ मारामारी काठ्या, कुर्‍हाडीसह कोयत्याने हल्ले, पाच जण गंभीर जखमी


बीड (रिपोर्टर):- जुन्या भांडणाची कुरापत काढून दोन गटात काठ्या-कुर्‍हाडीने मारामारी झाल्याची घटना बीड तालुक्यातील कामखेडा गावातील पवार तांड्यावर रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. या मारामारीच्या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या घटनेतील सर्वजण ऊसतोड मजूर असून या प्रकरणी दुपारपर्यंत बीड ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.

mu6
mu7
mu5


   याबाबत अधिक असे की, बीड तालुक्यातील कामखेडा गावातील पवार तांड्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून दोन गटात तुंबळ मारामारीझाली. ऊसतोड कामगार असलेल्या तांड्यावरील या दोन गटातील लोकांनी काठ्या कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सुरेश पांडुरंग पवार, संतोष विठ्ठल पवार, सुनिल बंडू पवार, निलाबाई अंकुश आडे, रमेश पवार हे गंभीर जखमी झाले. सदरची घटना ही रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. जुना किरकोळ वाद नेमका कशाचा होता? आणि रात्री तो का उफाळून आला हे अद्याप समजू शकले नाही. जखमींना स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सदरील मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सदरची घटना अधिक गंभीर असल्याचे दिसून येते. या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू होती.

Most Popular

error: Content is protected !!