Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोना अपडेट -आजच्या रिपोर्टमध्ये 824 पॉझिटिव्ह 868 रूग्णांना सुट्टी

कोरोना अपडेट -आजच्या रिपोर्टमध्ये 824 पॉझिटिव्ह 868 रूग्णांना सुट्टी


बीड (रिपोर्टर) कोरोनाचा संसर्ग बीड जिल्ह्यामध्ये कमी होत असताना दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसापासून रूग्णांची संख्या हजाराच्या आतच निघू लागली. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 824 पॉझिटिव्ह आढळून आले. 5705 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. एकूण 6529 जणांची तपासणी करण्यात आली होती. जिल्हाभरातील 868 जणांना सुट्टी देण्यात आली आहे.


महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या कमी होवू लागल्याने समाधान व्यक्त केले जावू लागले. बीड जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसापासून रूग्णांची संख्या घटत आहे. आज आलेल्या अहवालात 824 पॉझिटिव्ह रूग्ण आले. 5705 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून एकूण 6529 जणांची तपासणी करण्यात आली होती. जिल्हाभरातून आज 868 रूग्णांना सुट्टी देण्यात आली. आज आलेल्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 57, बीड 201, धारूर 44, गेवराई 54, केज 78, माजलगाव 51, परळी 21, पाटोदा 65, शिरूर 49 तर वडवणीमध्ये 22 रूग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!