Monday, June 14, 2021
No menu items!
Homeबीडकोरोनाने मयत झालेल्या शेतकरी कुटुंबांना कै.गोपीनाथरावजी मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ...

कोरोनाने मयत झालेल्या शेतकरी कुटुंबांना कै.गोपीनाथरावजी मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ द्या


बीड(रिपोर्टर): कोरोना या आजाराने मयत झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना कै.गोपीनाथरावजी मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत लाभ देण्यात यावा अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या दिड वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक गरीब शेतकर्‍यांचा मृत्यू कोरोना या आजारामुळे झालेला असुन या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असुन शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात अपघातात मयत झालेल्या अनेक शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी कै. गोपीनाथरावजी मुंडे अपघात विमा योजना सुरु असुन अपघातात मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येते. तसेच कोरोना हा आजार अपघातच असुन कोरोनामुळे झालेले मृत्यु अपघाती समजण्यात येऊन कोरोनानी झालेल्या मृत्युचा समावेश या योजनेत करण्यात यावा व कोरोनाने मृत्यु झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना कै. गोपीनाथरावजी मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत आर्थिक मदत करण्यात यावी  अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!