Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडकेज बसस्थानकातील कामगारावर आली उपासमारीची वेळ धारुर डेपोच्या मॅनेजरने तिन महिन्यापासून मानधन...

केज बसस्थानकातील कामगारावर आली उपासमारीची वेळ धारुर डेपोच्या मॅनेजरने तिन महिन्यापासून मानधन दिलेच नाही


केज (रिपोर्टर)ः- केज बसस्थानकामध्ये सफाई करणार्‍या कामगाराला गेल्या तिन महिन्यापासून धारुर डेपोने मानधन दिले नसल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळे आली. मानधनासाठी त्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला मात्र त्यांना पैसे देण्यात आले नसल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत वरिष्ठांनी दखल घ्यावी अशी मागणी कामगारांच्यावतीने करण्यात आली आहे.
केज बसस्थानक व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी एस.टी. महामंडळामार्फत धारुर बस डेपो मॅनेजरने मानधन बेसवर शेख खुदबोद्दीन या कर्मचार्‍याला नियुक्त केले. सदरील कामगाराला गेल्या तिन महिन्यापासून पगार देण्यात आली नसल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य नागरीक आर्थीक दृष्ट्या कमकूवत आहेत. असे असतांना धारुर डेपो मॅनेजरने खुदबोद्दीन यांना मानधन दिलेले नाही. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून तात्काळ मानधन देण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!