Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाcorona update-आजच्या रिपोर्टमध्ये 749 पॉझिटिव्ह

corona update-आजच्या रिपोर्टमध्ये 749 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- गेल्या चार-पाच दिवसांपासून बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठशेच्या दरम्यान निघत आहे. कोरोनाचा आकडा कमी होत असल्याचे दिसून येते. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 749 जण पॉझिटिव्ह आढळून आले. 4 हजार 569 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 5 हजार 318 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये अंबाजोगाई 44, आष्टी 97, बीड 210, धारूर 58, गेवराई 69, केज 83, माजलगाव 45, परळी 26, पाटोदा 45, शिरूर 50 आणि वडवणीमध्ये 22 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाही. इतर तालुक्यातील आकडा कमी होऊ लागला आहे. 

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!