Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडपरळीधनंजय मुंडेंनी केली परळीतील व्यापारी बांधवांसोबत दिवाळी साजरी

धनंजय मुंडेंनी केली परळीतील व्यापारी बांधवांसोबत दिवाळी साजरी

लक्ष्मी पूजनानिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे दिल्या व्यावसायिकांना भेटी, मंत्री थेट दुकानात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह!
परळी (दि. 15) —- : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी लक्ष्मी पूजनानिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी परळीतील व्यापारी बांधवांना त्यांच्या दुकानांवर जाऊन भेटी देऊन शुभेच्छा देत दिवाळी साजरी केली आहे. राज्याचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय थेट आपल्या दुकानी शुभेच्छा देण्यासाठी आल्याने व्यापारी बांधवांमध्ये नवचैतन्य व उत्साह स्पष्ट दिसून येत होता.
दरवर्षी ना.मुंडे हे परळी शहरातील मुख्य बाजारपेठेत सर्व व्यावसायिकांना दुकानात जाऊन लक्ष्मीपूजनानिमित्त शुभेच्छा देत असतात. या वर्षी कोरोना विषयक नियमांची खबरदारी घेत त्यांनी ही परंपरा कायम राखली. 
लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी राज्याचे मंत्री महोदय खुद्द आपल्या दुकानात येऊन शुभेच्छा देताना पाहून व्यापारी बांधवांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्यासमवेत युवक नेते अजय मुंडे, अभय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड, ऍड. गोविंदराव फड ,बाजीराव धर्माधिकारी,  प्रा. मधुकर आघाव, दीपक देशमुख, चंदूलाल बियाणी, , माणिकभाऊ फड, सूर्यभान मुंडे, राजाभाऊ पौळ, सुरेश अण्णा टाक, वैजनाथ सोळंके, भाऊडया कराड, विजय भोईटे, राजेंद्र सोनी, चेतन सौदळे, महादेव रोडे, विष्णू चाटे, प्रणव परळीकर, सचिन मराठे, शंकर कापसे, नाजेरभाई, विनोद जगतकर, सय्यद सिराज, बळीराम नागरगोजे, संजय फड, दीपक तांदळे, मनजीत सुगरे, अनिल अष्टेकर, शेख शंमो, शंकर आडेपवार, वैजनाथ बागवाले यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
लक्ष्मी पूजनानिमित्त ना. धनंजय मुंडे यांनी बाजारपेठेतील कृषी सेवा केंद्र, किराणा मालाचे दुकान, सुवर्णकार, कापड दुकाने, आडत दुकाने अशा अनेकविध व्यावसायिकांच्या लक्ष्मीपूजनामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला, प्रसादही घेतला व दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरापर्यंत व्यापारी बांधवांच्या भेटी गाठी सुरू होत्या. अनेक व्यापारी बांधव आपल्या गावच्या नेतृत्वाचे स्वागत करण्यासाठी उशिरापर्यंत बाजारपेठेत हजर होते. तत्पूर्वी त्यांनी आपल्या निवासस्थानी लक्ष्मीपूजन केले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!